Centre Raises Customs Duty on Gold and Silver
esakal
केंद्र सरकारने सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे आता विदेशातून सोने, चांदी आणि प्लॅटिनम आयात करणे अधिक महाग होणार आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने मंगळवारी यासंदर्भात अनेक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार नवीन दर हे १३ मेपासून म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत.