वेळवीत समाधान अभियानाला प्रतिसाद
गावतळे ः दापोली तहसील कार्यालयातर्फे वेळवी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील दळवी, सरपंच रणजित दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी तहसीलदार अर्चना बोंबे यांनी या उपक्रमाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध दाखले याबाबत माहिती देऊन लाभार्थींनी याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. सभापती उन्मेष राजे यांनी सुद्धा उपस्थित संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी व लाभार्थींना जास्तीत जास्त या अभियानाचा उपयोग व्हावा, असे सांगितले. या उपक्रमाचा वेळवी, कुडावळे, सुकोंडी, वीरसई, भोमडी, मानकवणे, खरवते, कांगवई, धानकोळी, रेवळी, कादिवली इत्यादी पंचक्रोशीतील गावांना लाभ मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.