‘अंबिकेश्वर’चा शुक्रवारी वर्धापनदिन
राजापूर, ता. १२ : तालुक्यातील चुनाकोळवण येथील अंबिकेश्वर प्रतिष्ठानचा १८वा वर्धापनदिन शुक्रवारी (ता. १५) मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने प्रतिष्ठानच्यावतीने ‘चुनाकोळवण महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवात ‘एक धाव एकीसाठी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा, आठ गावातील महिलांचे हळदीकुंकू, महिला व पुरुषांच्या विविध स्पर्धा, मिश्र-फळ लागवडीसंदर्भात मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय मुलांचा बक्षीस समारंभ, मान्यवरांचे मार्गदर्शन अशा विविध सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा अंबिकेश्वर प्रतिष्ठान, सुतारवाडी कार्यालय ते मारूती मंदिर, कळसवली या मार्गावर होणार आहे. स्पर्धा तीन गटात होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.