कोकण

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण

CD

- rat१३p५.jpg-
26O43161
संगमेश्वर ः जिल्हा परिषद शाळा मुर्शी नंबर १ च्या नूतनीकरणावेळी उपस्थित आमदार किरण सामंत. सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता बेंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, शर्वरी वेल्ये, राजू कुरूप, जया माने, मंगेश दळवी, बापू लोटणकर, संजय सुर्वे आदी.

ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणार
किरण सामंत ः मुर्शी शाळेला नवी झळाळी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १३ ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणेच दर्जेदार शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिक्षण क्षेत्राचा विकास हाच खऱ्या अर्थाने समाजाच्या प्रगतीचा पाया आहे, असे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले.
संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुर्शी नंबर १ येथील नूतनीकरण व विविध विकासकामांचे उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. या
कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार सामंत यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करून विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शाळेच्या नूतनीकरणामुळे विद्यार्थ्यांना आता सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक शैक्षणिक वातावरण उपलब्ध झाले आहे. या सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता बेंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्ये, तसेच राजू कुरूप, जया माने, मंगेश दळवी, बापू लोटणकर, संजय सुर्वे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT