अनधिकृत पार्किंगवर
कारवाईची मोहीम
चिपळूण : पॉवरहाऊस नाका येथील सर्व्हिस रोडवर वाहनांची अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांनी मंगळवारी (ता.१२) कारवाई केली. येथे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याबाबत पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेऊन पोलिसांनी ही कारवाई केली. सेवा रस्त्यावर उभ्या असलेल्या सहा वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच यापुढे कुणीही वाहने उभी करू नये असे आवाहन त्यांनी केले.
जानवळेत १७ ला
ज्ञानेश्वरी पारायण
गुहागर ः जानवळे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात अधिकमास निमित्ताने एक दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण व हरिपाठ कीर्तन सोहळा १७ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० ते दुपारी १ व दुपारी ३ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी ९/१२ अध्याय पारायण सोहळा होणार आहे. सायंकाळी ५.३० ते ६.३० वा.सामुदायिक हरिपाठ होईल. सायंकाळी ७ ते ९ वा. हरिकीर्तन होईल. या वेळी कीर्तनकार नारायण महाराज पवार, कोकण रत्न पुरस्कार प्राप्त संतोष महाराज दळवी, वारकरी साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष व सर्व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ जानवळे वार्ड क्रमांक २ यांच्या विद्यमाने मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम जांभळे, खजिनदार प्रभाकर दळवी, सचिव अमोल वनगे व सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे.
मठ येथे आज
बुद्ध विहार उद्घाटन
लांजा ः तालुक्यातील मठ येथील बौद्धजन विकास मंडळातर्फे बुद्ध विहार उद्घाटन सोहळा व तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम गुरुवारी (ता. १४) सकाळी १० वाजता मठ येथे होणार आहे. १४ ला सकाळी १० वाजता मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. विहाराचे उद्घाटन मुंबई मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे व ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष बबन कांबळे यांचे हस्ते होणार आहे. १५ ला सकाळी १० वाजता बुद्ध पूजा पाठ, धम्म देसना, विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभ, महिलांचे विविध कार्यक्रम व रात्री ८ वाजता मी रमाई बोलतेय हा एकपात्री कार्यक्रम होईल. रात्री १० वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.