कोकण

एलईडी माफियांची किनाऱ्यापर्यंत घुसखोरी

CD

swt1313.jpg
43212
मालवण : एलईडी नौका थेट किनाऱ्यापर्यंत घुसखोरी करत असल्याचे दिसत आहे.

एलईडी माफियांची किनाऱ्यापर्यंत घुसखोरी
बाबी जोगी : मंत्री, आमदारांच्या इशाऱ्यांना केराची टोपली
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १३ : एलईडी फिशिंग केली तर बोटी विसरून जा, असा कडक इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री देत आहेत, तर दुसरीकडे बेकायदेशीर बोटी फुटणार, अशा गर्जना स्थानिक आमदार आमसभेत करत आहेत. मात्र, या इशाऱ्यांनंतर परिस्थिती सुधारण्याऐवजी उलट अधिकच चिघळली आहे. मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या इशाऱ्यांना केराची टोपली दाखवत एलईडी माफिया आता थेट किनाऱ्यापर्यंत घुसखोरी करत आहेत. या प्रकारामुळे ‘हे इशारे फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी आहेत की काय?’ असा संतप्त सवाल मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री आहेत, त्याच जिल्ह्याच्या समुद्रात कायद्याने प्रतिबंधित असलेली एलईडी फिशिंग बिनधास्तपणे सुरू आहे. मंत्र्यांनी इशारा दिल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून या एलईडी बोटींनी अधिक आक्रमकपणे किनाऱ्यालगत येऊन मासेमारी सुरू केली आहे. मत्स्य विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, त्यांची ही ''बघ्याची भूमिका'' संशयास्पद वाटत आहे. संपूर्ण देशाच्या किनारपट्टीवर एलईडी मासेमारीला कायद्याने बंदी आहे. असे असतानाही सिंधुदुर्गच्या समुद्रात सुरू असलेल्या या लुटीमुळे पारंपरिक मच्छीमार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. मासळीचा दुष्काळ पडू लागल्याने मच्छीमारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

चौकट
प्रशासनाचे अपयश
मंत्र्यांच्या शब्दाला जर माफिया जुमानत नसतील, तर हे प्रशासनाचे अपयश आहे की सत्ताधाऱ्यांचा या माफियांना छुपा पाठिंबा? आज मच्छीमार रक्ताचे पाणी करून जगत असताना लोकप्रतिनिधींना त्यांची तळमळ का नाही? असा प्रश्नही श्री. जोगी यांनी उपस्थित केला आहे. ज्या पद्धतीने सध्या अनियंत्रित मासेमारी सुरू आहे, ते पाहता या महोदयांच्या कार्यकाळात सिंधुदुर्गची किनारपट्टी मच्छीमारीसाठी १०० टक्के ओस पडेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जर वेळीच यावर ठोस कारवाई झाली नाही, तर हा असंतोष येणाऱ्या काळात तीव्र आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही असेही श्री. जोगी यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT