कोकण

उद्योगमंत्री सामंत फिरणार इलेक्ट्रिक मोटारीतून

CD

उदय सामंत यांचा ई वाहनातून प्रवास
रत्नागिरी, ता. १३ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि इंधनाची बचत करण्यासाठी देशवासियांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी इलेक्ट्रिक मोटार वापरण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी त्यांनी नवीन इलेक्ट्रिक मोटारीतून प्रवासाला सुरुवात केली. लोकप्रतिनिधी म्हणून समाजात वावरताना आपण जे बदल करतो, त्याचा सकारात्मक संदेश जनतेपर्यंत जातो. जर आपण स्वतः बदलाची सुरुवात केली, तरच जनता त्याचे अनुकरण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्योगमंत्री म्हणून सामंत यांच्याकडे राज्यातील औद्योगिक धोरणांची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला मोठे प्रोत्साहन दिले जात असून, अनेक नामांकित कंपन्या आपले प्रकल्प राज्यात उभारत आहेत. अशा स्थितीत खुद्द उद्योगमंत्र्यांनीच इलेक्ट्रिक गाडीचा वापर सुरू केल्याने या क्षेत्रातील उद्योजकांना आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vat Purnima 2026 : सात जन्मच काय; पण एक क्षणही पत्नी नको! पत्नी पीडितांची आगळीवेगळी 'पिंपळ पौर्णिमा', झाडाला घातल्या 108 उलट्या प्रदक्षिणा

Thane News : आता ऑपरेशन टायगर- ३? ठाकरेंचे १४ आमदार फोडण्याची तयारी, ८ जुलैला पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाचा यलो अलर्ट

Solapur: आषाढीसाठी १० जुलैपासून व्हीआयपी दर्शन बंद, मंदिर परिसरात ‘नो व्हेईकल झोन’; स्वच्छता, आरोग्य, वाहतूक सुविधांवर भर

Vat Purnima : आज वटपौर्णिमा; सकाळी ६ ते १०.३० हा पूजेसाठी उत्तम कालावधी, दुपारी १२.०८ ते १२.५९ या वेळेतही करता येईल पूजा; भद्रा काळ वर्ज्य नाही

SCROLL FOR NEXT