-rat१३p२१.jpg-
२६O४३२५१
राजापूर ः जनता दरबारामध्ये बोलताना आमदार किरण सामंत. शेजारी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, राजापूरचे उपविभागीय अधिकारी विश्वजित गाताडे आदी.
-----
पाणी, रस्ते, वाळू उपसा प्रश्न ऐरणीवर
नागरिकांनी वेधले लक्ष; १५ दिवसात कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
राजापुरात पहिला जनता दरबार-------लोगो
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या जनता दरबारात महसूल, पाणीपुरवठा, आरोग्य, रस्ते, अतिक्रमण आणि बेकायदा वाळू उपसा यांसारख्या विविध प्रश्नांवर नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या सर्व प्रश्नांची दखल घेत संबंधित विभागांनी १५ दिवसांत कार्यवाही अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
राजापूर येथील नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात झालेल्या या जनता दरबारास जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरबारात एकूण ६५ निवेदने सादर करण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी विश्वजित गाताडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम, तहसीलदार विकास गंबरे, सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजित गुरव, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार आदी उपस्थित होते.
बारसू येथील विनायक कदम यांनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणी, रोजगारनिर्मिती आणि अवैध दारूविक्री रोखण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस आणि महसूल विभागाला तातडीने कारवाईचे निर्देश दिले.
धाऊलवल्लीचे रूपेंद्र कोठारकर यांनी बेकायदा वाळू उपशाबाबत महसूल विभागाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली. महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी स्पीडब्रेकर व सूचना फलक उभारण्याची मागणी अजिम जैतापकर यांनी केली. शहरातील पाणी योजनेसाठी खोदलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत, अशी मागणी विनायक सावंत यांनी केली. तर विविध गावांतील ग्रामस्थांनी पाणीटंचाई, अतिक्रमण, वारस नोंदी आणि सातबारा दुरुस्तीचे प्रश्न मांडले.
-------
जनता दरबारातील प्रमुख मागण्या
* मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणी
* अवैध दारूविक्रीवर कारवाई
* बेकायदा वाळू उपसा रोखा
* महामार्गावर स्पीडब्रेकर व सूचना फलक
* पाणीटंचाई दूर करण्याची मागणी
* सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण हटविणे
* वारस नोंदी व सातबारा दुरुस्ती प्रक्रियेला गती
* पाणी योजनेसाठी खोदलेले रस्ते दुरुस्त करणे
----
नेते अन् प्रशासनाशी थेट संपर्क
राजापूर येथे झालेल्या या जनता दरबारास जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित असल्याने त्यांच्यासमोर सामान्यांना थेट प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. त्या प्रश्नावर प्रशासनाकडून तात्काळ कृती झाल्याने त्याचे राजापूरवासीयांकडून स्वागत होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.