kan131.jpg
43263
कणकवली : येथील तहसील कार्यालयात झालेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींनी सज्ज राहावे
प्रांताधिकारी जगदीश कातकर : विभाग प्रमुखांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १३ : नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी केवळ महसूल यंत्रणा किंवा तालुकास्तरापुरती मर्यादित नाही. गावपातळीवरही आवश्यक उपाययोजना तातडीने होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतींनी टॉर्च, कटर, लाईफ जॅकेट, दोरखंड यांसारखे अत्यावश्यक साहित्य उपलब्ध ठेवून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले.
येथील तहसीलदार कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते. काही विभाग प्रमुखांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त करत संबंधितांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार असल्याचेही श्री. कातकर यांनी स्पष्ट केले.
कणकवली शहरातील गटार सफाई आणि रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. शहरातील ४० गटारांपैकी २६ गटारांची कामे पूर्ण झाली असून रस्त्यांवरील बहुतांश खड्डे बुजविण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी श्री. अगम यांनी दिली. आचरा रोडवरील खड्ड्यांचे काम अद्याप बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्थितीत पुलावर किंवा मोऱ्यांवर पाणी साचल्यास वाहने रोखण्यासाठी पोलिसांनी वेळेत बॅरिकेटिंग करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईची वेळ कोणावरही येऊ नये यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करून यंत्रणा सतर्क ठेवावी, असे निर्देश प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिले.
चौकट
बैठकीतील प्रमुख मुद्दे -
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा बैठकीत आढावा
आवश्यक ठिकाणी साईड पट्टे, रम्बलर बसविणे आणि रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना
धोकादायक झाडांच्या फांद्या आणि बॅनर हटविण्याचे निर्देश
नडगिवे येथे रम्बलर बसविण्याचे काम सुरू; कणकवलीतही लवकरच काम सुरू होणार
कासार्डे ओव्हरब्रिजवरील कोसळलेल्या प्लास्टरबाबत आवश्यक कार्यवाहीच्या सूचना
पावसाळ्यात शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ग्रामपंचायत विभागाला निर्देश
जीर्ण शाळांची तातडीने दुरुस्ती किंवा निर्लेखन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश
धोकादायक परिस्थितीतील शाळांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे निर्देश
विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट
आपत्तीच्या काळात ग्रामपंचायतींनी प्रथम प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचे मत
तहसील, प्रांत कार्यालय आणि पोलीस यंत्रणेची भूमिका समन्वयाची असल्याचे स्पष्ट
स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने कार्यवाही करण्याच्या सूचना
वादळी पावसामुळे खारेपाटण व चिंचवली परिसरातील खंडित वीजपुरवठ्याबाबत चर्चा
महावितरणला तातडीने अपडेट देणे, मनुष्यबळ वाढविणे आणि त्वरित उपाययोजनांचे निर्देश
यवतेश्वर येथील बीएसएनएल टॉवरसाठी जागा निश्चित नसल्याने सेवा सुरू नसल्याची माहिती
कृषी विभागाकडून मंडळ स्तरावर पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्याची माहिती
फोंडाघाट येथील स्वयंचलित पर्जन्यमापकासाठी नवीन जागेचा प्रश्न मार्गी
आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालयातील औषधसाठा आणि साथीच्या रोगांवरील उपाययोजनांचा आढावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.