- rat१४p७.jpg-
26O43348
लांजा ः येथील जनता दरबारात समस्या जाणून घेताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल. सोबत आमदार किरण सामंत.
जनता दरबारात समस्यांचा पाऊस
लांज्यातील सुविधांकडे वेधले लक्ष; जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १४ ः लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत लांजा येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात महसूल, ग्रामविकास, पाणीपुरवठा, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि कृषी विभागांशी संबंधित सुमारे ५२ अर्जदारांनी आपली समस्या मांडली. या समस्यांवर लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी उपस्थितांना दिले.
बुधवारी (ता. १३) झालेल्या या जनता दरबारात लांजा तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी आणि मागण्या थेट प्रशासनासमोर मांडल्या. या जनता दरबारात नागरिकांनी वैयक्तिक आणि सार्वजनिक प्रश्नांवर सविस्तर निवेदने दिली आहेत.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना देताना सांगितले की, सामान्य माणसाच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. नागरिकांच्या समस्या वेळेत मार्गी लावण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे.
जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी अनेक प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. काही प्रकरणांमध्ये संबंधित विभागांना जागेवरच कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी राजापूर प्रांताधिकारी आणि विभाग प्रमुखांना प्राप्त झालेल्या प्रत्येक अर्जाचा सखोल पाठपुरावा करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. लांजा तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यक्रमाला लांजा-राजापूरमधील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.