- rat१४p१३.jpg-
26O43359
चिपळूण ः पशुवैद्यकीय औषध वाटप कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम.
शेतीला पशुपालनाची जोड द्या
पूजा निकम ः सावर्डेत पशुधन योजनेवर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १४ ः ‘शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार केवळ पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता पशुपालनाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. जिल्हा परिषद आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम यांनी दिली.
सावर्डे येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये पूजा निकम यांच्या पुढाकाराने आयोजित ‘पशुधन विविध योजना मार्गदर्शन व औषध वाटप’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला सावर्डे पंचक्रोशीतील पशुपालक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित पशुपालकांना मार्गदर्शन करताना पूजा निकम म्हणाल्या की, पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण आणि योग्य औषधोपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. पशुपालकांनी वितरित केलेल्या औषधांचा योग्य वापर करून आपल्या पशुधनाचे आरोग्य जपावे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डाकोरे, डॉ. यादव, डॉ. भोईर आणि डॉ. बेलवडे यांनी पशुधनाचे आरोग्य, पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव, लसीकरणाचे महत्त्व आणि योग्य पशुखाद्य व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित पशुपालकांना विविध पशुधन औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, शरद शिगवण, बाळू मोहिरे, मानसिंग बंधू महाडिक, शरद भुवड, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.