कोकण

चिपळूणमध्ये बालकलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध

CD

- rat१४p१४.jpg-
26O43360
चिपळूण : बालनाट्य शिबिराच्या कार्यक्रमाला हजेरी लावणारे मुख्याधिकारी संजय जाधव यांचा सत्कार करताना डॉ. प्रशांत पटवर्धन.

‘बालनाट्य शिबिरा’तून फुलली कला
अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुढाकार ;चिपळूणवासीयांची दाद
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे आयोजित १० दिवसीय ‘बालनाट्य शिबीर २०२६’ या उपक्रमाची नुकतीच उत्साहात सांगता झाली. या शिबिराच्या माध्यमातून बालकलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावरही भर देण्यात आला.
बेंदरकर आळी येथील माधवबाग सभागृहात पार पडलेल्या या शिबिरात मुलांना अभिनय, संवादफेक, शरीरभाषा, रंगमंचावरील हालचाली आणि स्टेज डेरिंग यांसारख्या विषयांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. प्रा. रश्मी नंदकुमार देव यांनी मुलांना प्रभावी मार्गदर्शन करत एक आदर्श नागरिक म्हणून घडण्यासाठी आवश्यक मूल्यांचीही ओळख करून दिली. शिबिराचा सांगता समारंभ इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पार पडला. यावेळी बालकलाकारांनी नाट्य अभिवाचन, ‘आई मला भूक लागली’ ही बाल नाटुकली, ‘झेप’ एकांकिका, मूकाभिनय (Mime), नाट्यछटा आणि कथाकथन यांसारखे विविध प्रकार आत्मविश्वासाने सादर केले. मुलांचा रंगमंचावरील वावर आणि अभिनय कौशल्य पाहून उपस्थितांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव, नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, मार्गदर्शिका प्रा. रश्मी देव, ॲड. विभावरी रजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. मीनल ओक यांनी सूत्रसंचालन केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

No Vehicle Day : पंतप्रधानांच्या आवाहनाला साद! महापौर शासकीय वाहन सोडून ई-स्कूटरने पोहोचल्या मनपात

Anand Paranjpe: राष्ट्रवादीचा 'आनंद' दुरावला! परांजपेंनी पक्षाला रामराम ठोकला; पण तडकाफडकी निर्णय नेमका का घेतला?

Sleep Death : आपण झोपेत खरंच मरतो का? विज्ञान काय सांगतं, जाणून घ्या रहस्य

IPL 2026 : जेमी ओव्हरटनची माघार, CSK च्या संघात दाखल झाला दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक ऑलराऊंडर! शेवटच्या टप्प्यात मजा येणार

WPI Inflation: महागाईचा स्पोट! घाऊक दर 42 महिन्यांच्या उच्चांकावर; पेट्रोल-गॅसच्या किमतींनी वाढवला दबाव

SCROLL FOR NEXT