कोकण

सावंतवाडी पंचायत समितीचा कारभार रामभरोसे

CD

swt142.jpg
43362
गुरुदास गवंडे

सावंतवाडी पंचायत समितीचा कारभार रामभरोसे
गुरुदास गवंडे : गटविकास, विस्तार अधिकारी गेले साताऱ्याला
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ : येथील पंचायत समितीला वालीच कोण नसून कारभार रामभरोसे चालू आहे. प्रभारी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तपासणी करीता सातारा येथे गेले असून आठ दिवस पंचायत समितीला वाली कोणी नाही. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गाड्यांची हवा सोडवण्यापेक्षा प्रशासनातील ढिसाळ कारभारावर लक्ष घालावा, असा टोला मनसेचे पदाधिकारी, सरपंच सेवा संघाचे येथील माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी लगावला.
ते म्हणाले, याबाबत सावंतवाडी प्रभारी गटविकास अधिकारी यांना विचारले असता आपण १८ मे रोजी हजर होणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा प्रशासन आवारातील गाड्यांच्या हवा सोडवण्यापेक्षा प्रशासनातील ढिसाळ कारभारावर लक्ष घालावा. कारण, सावंतवाडी पंचायत समितीमध्ये रामभरोसे कारभार चालू आहे. दोन विस्तार अधिकारी पद असताना इकडचा एक विस्तार अधिकारी सुजित येरवळकर हा २३ मे २०२२ रोजी उसनवारीने तीन वर्षाकरिता पंचायत समिती कोरेगाव जिल्हा सातारा येथे १४ जून २०२३ ला सावंतवाडी येथून बदली झालेले आहेत. असे असताना त्यांची प्रशासकीय हजेरी मात्र सावंतवाडीतून लागते.
तालुक्यामध्ये ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे अशा या कारभारावर लक्ष ठेवण्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी हे हवा सोडण्यात मग्न आहेत. त्यांच्या या अशा वागण्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे अगोदर आपला प्रशासनाचा कारभार व्यवस्थित चालवा आणि नंतर इतरत्र बघा असा टोला सरपंच सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी लगावला.

चौकट
प्रशासन कारभारात सुधारणेची गरज
प्रशासनामध्ये अनेक पद रिक्त आहेत. लोकांवर दबाव टाकून प्रधानमंत्री घरकुल योजनेची घरे पूर्ण करण्यात आली‌. परंतु, अजून पर्यंत लाभार्थ्यांना त्यांचे पैसे मिळत नाहीत. शासनाकडे निधी नाही तर मग लाभार्थ्यांवर का दबाव टाकता? त्यामुळे अगोदर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी आपल्या प्रशासन कारभार सुधारावा, असाही सल्ला श्री. गवंडे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT