कोकण

दळवटणेत स्वगणना १०० टक्के पूर्ण

CD

- rat१४p१५.jpg-
26O43384
चिपळूण ः दळवटणे येथे गणगनेची स्वगणना करताना प्रगणक
----
दळवटणेत स्वगणना १०० टक्के पूर्ण
जनगणना मोहीम ; नऊ वाड्यातील ४२५ कुटुंबांची नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः जनगणना मोहिमेचा श्रीगणेशा झाला असून, तालुक्यातील मौजे दळवटणे गावाने या मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दळवटणे गावाने स्वगणना प्रक्रिया १०० टक्के पूर्ण केली असून हे गाव जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरयादी आणि घरगणनेची पूर्वतयारी म्हणून १ ते १५ मे २०२६ हा काळ ‘स्वगणना’ करण्यासाठी निश्चित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यातील मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमासाठी दळवटणे गावाची निवड करण्यात आली होती. गावाने या विहित मुदतीत आपल्या सर्व नऊ वाड्यांमधील ४२५ कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
​२०११ च्या जनगणनेनुसार दळवटणे गावाची लोकसंख्या १८७१ इतकी होती. मात्र ताज्या स्वगणनेच्या आकडेवारीनुसार गावची अंदाजे लोकसंख्या आता २२६२ झाली असून एकूण कुटुंबांची संख्या ४२५ आहे. स्वगणना वेळेत पुर्ण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्री. लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे आणि खेर्डी मंडळाचे मंडळ अधिकारी नारायण चौधरी यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या मोहिमेत प्रगणक वैशाली पेड्डेवाड, सचिन जाधव, प्रिया मोरे, मदतनीस शीतल कराडकर, रोशनी जाधव, ऋतुजा इंगवले, मेघना नलावडे, सुप्रिया बोबले, अर्चना जाधव, सीमा गमरे, सुवर्णा जाधव आणि पोलीस पाटील अमित मोहिते यांनी काम पाहिले.
-------
चौकट
वाड्यानिहाय स्वगणनेचा तपशील
दळवटणे येथील शेट्येवाडी १८, गणेशवाडी- ५१, बागवाडी- ६७, रामवाडी- १८, भुवडवाडी- ६४, नलावडेवाडी- १०१, बडदेवाडी- ३५, राजवाडा- २२, बौद्धवाडी- ४९ अशी एकूण ४२५ कुटुंबाची सर्व १०० टक्के स्वगणना पूर्ण झाली. दळवटणे गावाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे जिल्हा प्रशासनाकडून गावचे कौतुक होत असून, आगामी जनगणनेसाठी हे गाव आदर्श ठरले आहे.
-----------------
कोट
गणगणना मोहिमेत स्वगणना करण्यासाठी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली दळवटणे गावाची निवड झाली. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून चांगले मार्गदर्शन मिळाले. स्वगणनेसाठी गावात कुटुंबाना भेटी देताना ग्रामस्थांनी देखील सहकार्याची भूमिका बजावली. त्यामुळे स्वगणना वेळेत होण्यास मदत झाली.
----ऋतूजा रूपेश इंगवले, अंगणवाडी सेविका, दळवटणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT