‘घनकचरा व्यवस्थापन विषय गांभीर्याने घ्या’
रत्नागिरी ः प्रत्येक विभागाला घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जबाबदारी देण्यात येणार असून, प्रत्येकांनी ती तंतोतंत पार पाडावी. घनकचरा व्यवस्थापन हा विषय सर्वांनी गांभीर्याने घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या अंमलबजावणी, देखरेख व अनुपालनासाठी जिल्हास्तरीय विशेष कक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिकृत व अनधिकृत डम्प साईट्सची तपासणी करावी. कचरा प्रक्रीया, विल्हेवाट प्रकल्पांचे पर्यावरणीय अनुपालन तपासावे. स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधावा तसेच जिओ-टॅग केलेल्या छायाचित्रांसह तपासणी अहवाल सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
जागतिक शहर विकास परिषदेत
मिलिंद कीर होणार सहभागी
रत्नागिरी ः रत्नागिरी शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करणारे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांना संयुक्त राष्ट्रातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या वर्ल्ड अर्बन फोरम २०२६ साठी अधिकृत निमंत्रण प्राप्त झाले आहे. ही परिषद बाकू येथे होणार असून, महाराष्ट्रातील मोजक्या व्यक्तींमध्ये कीर यांचा समावेश आहे. रत्नागिरी शहराच्या भविष्यातील विकासासाठी सुमारे १ हजार ८३० कोटी रुपयांच्या तरतुदीसह व्हिजन प्लान मंजूर करून घेण्यात श्री. कीर यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. सध्याच्या इराण परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन श्री. कीर हे या परिषदेत ऑनलाईन माध्यमातून सहभागी होणार आहेत.
- rat१४p२३.jpg-
26O43431
संगमेश्वर ः छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देताना पोलिस बँड पथक आणि जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे.
------
छत्रपती संभाजी महाराज यांना
पोलीस बँड पथकाकडून मानवंदना
संगमेश्वर ः छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त संगमेश्वर कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे रत्नागिरी पोलीस दलातर्फे प्रथमच पोलिस बँड पथकासह औपचारिक मानवंदना देण्यात आली. पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
श्लोक शिंदेंचा चिपळूण पालिकेत सत्कार
चिपळूण : रत्नागिरी येथे झालेल्या राष्ट्रीय स्वास्थ्य व राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या येथील श्लोक सचिन शिंदे याचा नगरपालिकेतर्फे मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे, मंगेश पेढांबकर, स्वच्छता निरीक्षक सुजित जाधव, विनायक सावंत, प्रवीण जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, विकास कांबळे, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर आदी उपस्थित होते.
जीआयटीच्या निबंध स्पर्धेत शईजान शेख प्रथम
चिपळूण ः खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा इस्टीट्युट ऑफ टेक्नालाजीच्य़ा ग्रंथालय विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी जिल्हास्तरीय निंबध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कालुस्ते हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील शईजान दस्तगिर शेख याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेसाठी वाचन सर्जनशीलता आणि ज्ञानाची गुरुकिल्ली व वाचनाच्या माध्यमातून भविष्याला आकार देणे हा विषय देण्यात आला होता. फुरुस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेड येथील पौर्णिमा चंद्रकांत केतकर हिला द्वितीय क्रमांक मिळाला. प्राचार्य प्रमोद पाटील यांच्या हस्ते दोघा विजेत्यांना बक्षिस व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी उपप्राचार्य सचिन पाटील, रजिस्ट्रार संदिप मुंनघाटे आदी उपस्थित होते.
-------
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात
छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी
देवरुख ः देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्यावतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी आपल्या मनोगतात छत्रपती संभाजी महाराज हे केवळ शूर योद्धे नव्हते, तर विद्वान, दूरदृष्टी असलेले आणि राष्ट्रप्रेमाने प्रेरित नेतृत्व होते असे प्रतिपादन याप्रसंगी केले. कार्यक्रमास प्रा. धनंजय दळवी, कार्यालय अधीक्षिका मिता भागवत तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.