-rat१४p२०.jpg-
26O43428
लाल भात
-rat१४p२१.jpg-
26O43429
लाल भाताची केलेली लागवड.
---
गोयकारांना भावला कोकणचो लाल भात
‘रत्नागिरी-७ वाण’ला वाढती पंसती ; ३०० किलो बियाण्यांचा पुरवठा
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः कोकणात पावसाळा जवळ येऊ लागल्याने शेतकरी भात बियाण्यांच्या खरेदीसाठी सज्ज झाला आहे. कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या बारीक दाणे आणि लाल भात जातींच्या बियाण्यांना यंदा मोठी मागणी आहे. यंदा गोव्यातूनही ‘रत्नागिरी-७’ या लाल भात जातीला पसंती मिळाली असून ३०० किलो बियाणे तेथे पाठवण्यात आल्याची माहिती केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. नीलेश सोनोने यांनी दिली.
मे महिन्यापूर्वीपासूनच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर तसेच गोवा राज्यातील शेतकऱ्यांकडून बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार केंद्राने रत्नागिरी ८, रत्नागिरी ६ आणि रत्नागिरी ७ (लाल तांदूळ) या जातींचे मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे. त्यात बियाणे निर्मितीसाठीचे (पैदासकार) आणि शेतकऱ्यांना लागवडीकरता (सत्यता दर्शक) बियाणे उपलब्ध करून दिले गेले आहे. पैदासकार बियाणे शंभर टक्के शुध्द असेच असते. त्यामधून पुढील वर्षासाठी आवश्यक बियाणे निर्माण केले जाते. संशोधन केंद्रातून वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जात आहेत. यावर्षी राजापूर तालुका खरेदी-विक्री संघाला ८५० किलो, लांजा खरेदी-विक्री संघाला १ हजार ५०० किलो, चिपळूण येथे ५ हजार किलो तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६ हजार किलो भात बियाणे विक्रीसाठी दिले आहे. खासगी विक्रेते आणि कृषी विभागामार्फत ५ हजार आणि १ हजार किलो बियाण्यांचा पुरवठा केला असून नाचणे, कोतवडे, पावस, सोमेश्वर, गणेशगुळे परिसरातील शेतकऱ्यांना ७०० किलो बियाणे दिले आहे.
-----
तीन प्रकारच्या जातींना प्राधान्य
* हळव्या जाती : १२० दिवसांत तयार
* निमगरव्या जाती : १२० ते १३५ दिवस
* गरव्या जाती : १३५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी
-----
बियांण्यांचे वितरण (आकडेवारी क्विंटलमध्ये) :
बियाणे* सत्यता दर्शक (शेतकऱ्यांसाठी)* पैदासकार(बियाणे निर्मितीसाठी)
रत्नागिरी ७ व ८* १३६.६* १४.७
रत्नागिरी १* ६०.३* ८.४
रत्नागिरी ६* २८.६* ४.१०
---
भाताच्या १२ जाती उपलब्ध
शिरगाव कृषी संशोधन केंद्राने भाताबरोबरच भुईमूग आणि तीळ पिकांच्या विविध जाती विकसित करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. केंद्राकडून शेतीविषयक मार्गदर्शनही केले जाते. सध्या केंद्राकडे भाताच्या १२ जाती उपलब्ध असून रत्नागिरी १, रत्नागिरी २४, रत्नागिरी ६ (लाल दाणे), रत्नागिरी ७, रत्नागिरी ८ आणि कोकण सुवास या जातींना मागणी आहे, असे डॉ. सोनोने यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.