कोकण

मळेवाड येथे मोटारीला अपघात

CD

43450

मळेवाड येथे मोटारीला अपघात
रस्त्याच्या कडेला धडक : पाच किरकोळ तर तीन गंभीर जखमी
सकाळ वृत्तसेवा
मळेवाड, ता. १४ : वेंगुर्लेहून सातार्डाच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीला मळेवाड जांभळीचे भरड येथे अपघात झाला. यात पाच जण किरकोळ तर तीन गंभीर जखमी झाले.
दांडेली येथे लग्नाला जात असताना मळेवाड येथे रस्त्याच्या कडेला जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. गाडीच्या एअर बॅग उघडल्या. यानंतर स्थानिकांनी प्रथम उपचारासाठी जखमींना मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. यावेळी त्याठिकाणी प्राथमिक उपचार करून तिघांना अधिक उपचाराकरिता १०८ रुग्णवाहिकेने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. किरकोळ जखमींवर उपचार करून घरी पाठविण्यात आले. जखमींमध्ये दिया रमेश पाटकर (वय १८) हिच्या हाताला, रमेश साबाजी शेगले (वय ५२) यांच्या डाव्या पायाला तर नम्रता वल्लभ शिरगावकर (वय २७) यांच्या नाकाला या तिघांना गंभीर दुखापत झाली. वंदना वल्लभ शिरगावकर (वय ५०), रचना रमेश शेगले (वय ४५), मनस्वी रमेश पाटकर (वय १६), वल्लभ जयदेव शिरगावकर (वय ५८), चालक संजय एकनाथ भाटकर (वय ४६, सर्व रा. वेंगुर्ले) या पाच जणांना किरकोळ दुखापत झाली. अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र, अपघाताची प्राथमिक माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT