कोकण

कुणकेश्वर येथे आजपासून आंबा महोत्सवाचे आयोजन

CD

कुणकेश्वर येथे आजपासून
आंबा महोत्सवाचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १४ ः कोकणातील पर्यटनाला चालना देण्याबरोबरच स्थानिक पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने राज्याच्या पर्यटन विभागाद्वारे तालुक्यातील कुणकेश्वर येथे उद्यापासून (ता. १५) सोमवारपर्यंत (ता. १८) आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात आंब्याच्या विविध प्रजाती ‘फार्म टू टेबल’ संकल्पनेतून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत आंब्यांची विक्री होणार असून कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक उत्पादनेही विक्रीसाठी उपलब्ध राहतील. तसेच आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजनही करण्यात येणार आहे. या महोत्सवात आंब्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. महोत्सवादरम्यान कोकणच्या पारंपरिक संस्कृतीची झलक दाखविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये दशावतार, पालखी सोहळा, स्वराज्य आख्यान, कोकण कलेक्टिव्ह बँड तसेच महिलांच्या सन्मानार्थ होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचा समावेश आहे. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

Pune Civic Row: कात्रज आरोग्य केंद्राच्या दुहेरी उद्‍घाटनावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने, स्थायी समितीत ठराव रखडला

Pune Accident : लुटमार, मदतीचा हात अन् काळाचा घाला! शिरूर बायपासवर महिलेचा दुर्दैवी अंत, एका रात्रीत दोन संकटांचा सामना, काय घडलं..

१ जुलैपासून पेट्रोल-डिझेल खरेदीच्या नियमात बदल, केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Dombivli Politics: निवडणुकीत विरोधक, विकासकामात एकत्र; म्हात्रे कुटुंबाच्या व्यासपीठावरील भेटीने डोंबिवलीच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT