कोकण

पेट्रोल दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

CD

kan152.jpg
43541
कणकवली : पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसैनिकांनी आंदोलन केले. (छायाचित्र : अनिकेत उचले)

पेट्रोल दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन
कणकवलीत केंद्र सरकारचा निषेध; मंत्र्यांच्या ताफ्यात अजूनही मोठ्या संख्येने वाहने
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १५ : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये तीन रूपयांची वाढ करण्यात आली. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्यावतीने आज कणकवलीत आंदोलन करण्यात आले. शहर बसस्थानक ते पटवर्धन चौकापर्यंत शिवसैनिकांनी मोर्चा काढला. यात केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
दुपारी बारा वाजता माजी आमदार आणि शिवसेना जिल्‍हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्‍वाखाली कणकवली बसस्थानकातून पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात मोर्चा काढण्यात आला. शहरातील पटवर्धन चौकात या माेर्चाचे विजर्सन करण्यात आहे. यावेळी श्री. नाईक यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र टीका केली.
ते म्‍हणाले, सध्या केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन रूपये वाढ केली आहे. त्‍यामुळे आत्ताच सर्वसामान्यांनी रस्त्यावर उतरून या दरवाढीचा निषेध करायला हवा. जर जनतेमधून या दरवाढी विरोधात कुठलेही आंदोलन झाले नाही तर पुढील महिन्याभरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या दरवाढीमुळे महागाईने होरपाळणाऱ्या सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले गेले आहे.
या आंदोलनात शिवसेना जिल्‍हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक, मधुरा पालव, उत्तम लोके, राजू राठोड, अजित काणेकर, तेजस राणे, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, बबली राणे, आबू मेस्त्री, विलास गुडेकर, योगेश मुंज, शुभम परब, संतोष चव्हाण, विलास नाईक, चेतन पाटील, फैयाज शेख, सहदेव नाईक, निळकंश राणे आदी उपस्थित होते.

चौकट
नाईक म्हणाले,
सिलिंडर दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिकांना व्यवसाय करणे कठीण.
इंधन दरवाढीमुळे दूध, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ.
दरवाढीने सर्वसामान्यांचे जगणे कठीण.
पंतप्रधान मोदी यांनी विदेशी दौरे टाळण्याचे आवाहन केले; मात्र त्यांचे विदेशी दौरे सुरूच.
केवळ एक-दोन मंत्र्यांकडून बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा वापर.
इतर मंत्र्यांचे वाहन ताफे कायम असून मोठ्या प्रमाणात पेट्रोलची उधळपट्टी.
इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे यापुढेही तीव्र आंदोलन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT