कोकण

पाक पोषण

CD

पाक-पोषण ................लोगो
(९ मेन टुडे ३)

रानमेवा समजून घेऊन
त्याला आहारात स्थान हवे

अँटीऑक्सिडंट्स शरीराची झालेली झीज भरून काढतात आणि ही प्रक्रिया व्हायला ‘क’ जीवनसत्त्व मदत करते. ‘क’ जीवनसत्व देणारी ही फळे आपल्याला ताजी खायला मिळत नाहीत. शेतकऱ्याने किमान चार दिवस आधी काढलेली ही फळे घाऊक बाजारातून मग किरकोळ बाजार असा प्रवास करत करत आपल्या पर्यंत पोहोचतात. अनेकदा ही फळे लवकर पिकावी किंवा त्यांना चांगला रंग यावा म्हणून विविध रसायने फवारली जातात. अशावेळी या फळांच्या सेवनामुळे आपल्याला नक्की कोणती पोषकद्रव्ये मिळत असतील याचा विचार झाला पाहिजे.
- rat१५p१.jpg-
P26O43538
- संगीता खरात, देवरूख
सह संचालिका, सृष्टीज्ञान संस्था
----
करवंद, जांभूळ, आंबा, काजू गर, चिंचा, बोरे, कमरक, ताडगोळे, फणस, राय आवळा, जांब, अळू, तुती हे शब्द कानावर पडले तरी तोंडाला पाणी सुटते आणि डोळे मिचकावल्याशिवाय आपण याबद्दल काहीही बोलू शकत नाही. नेमक्या वार्षिक परीक्षा आणि या फळांची झाडावर यायची एकवेळ होते आणि आई ओरडते परीक्षा झाल्या की खा आता खोकला-ताप काही नकोय. सुट्या लागायची वाट पहायची आणि नंतर रानातल्या या सर्व फळांचा फडशा पाडायला पळायचे. आमचे लहानपण तर असेच गेले. काही प्रमाणात गावाकडच्या मुलांना हा आनंद मिळत असेलही मात्र शहरातील मुलांना ही फळे तेवढीशी चाखायला मिळत नाहीत. काही शाळांच्या बाहेर ही फळे विकणाऱ्या गाड्या येतात खऱ्या पण स्वच्छतेचे निकष लावून ही फळे खावी असे काही पालकांना वाटत नाही आणि मुलांना तर त्यांची नीट ओळखच नसते. त्यामुळे चायनीज भेळ आणि मांचुरियनच्या गाडीवर ज्या ओढीने ही मुले जातात तेवढ्या ओढीने या फळांकडे वळत नाहीत.
खरे तर उन्हाळ्याच्या झळा आणि त्यामुळे होणारे विविध आजार दूर ठेवण्यासाठी ही फळे उपयुक्त आहेत. जागतिक तापमान वाढीमुळे वाढणारे तापमान सुसह्य करण्यासाठीच ही स्थानिक फळे नेमका मोसम साधून येत असतात. हवामान बदलासारख्या समस्येला तोंड द्यायचे असेल तर स्थानिक अन्न-धान्य आणि भाज्यांबरोबरच या रानमेव्याचे आपल्या आहारात महत्त्वाचे स्थान आहे. खरे तर आता बाजारात सर्व मोसमात सर्व फळे उपलब्ध असतात. मात्र या फळांमध्ये पोषण मूल्ये, नैसर्गिक साखर, तंतुमय पदार्थ, खनिजे आणि जीवनसत्त्वे किती मिळतील याबाबत शंकाच आहे. रोगप्रतिकारक शक्ती मिळवण्यासाठी आजकाल छोट्या तालुक्यांच्या बाजारातही ड्रॅगनफ्रूट आणि किवी सारखी परदेशी फळे दिसू लागली आहेत. आणि ही रासायनिक पद्धतीने पिकवलेली महाग फळे आपण विकत घेऊन खातोय. असे आहे तरी काय या फळात? या ताज्या फळांच्या सेवनामुळे आपल्याला मिळते भरपूर पाणी, ‘क’ जीवनसत्त्व आणि अँटीऑक्सिडंट्स! पाणी अर्थात आपल्याला तजेला देते,
रानमेवा हा रानात कोणत्याही रासायनिक खतं किंवा कीटकनाशकाशिवाय उगवून आलेला असतो. या सर्व फळांमध्ये व्हिटॅमिन सी, नैसर्गिक साखर, तंतुमय पदार्थ, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. ही फळे तुमची तहान भागवू शकतात. उन्हाची काहिली कमी करू शकतात. तुमच्या पोटातील पित्ताला शांत करून उन्हाळ्यातील आजार कमी करू शकतात. रानमेवा हा जंगलात आणि डोंगर कड्यांमध्ये पायपीट करून आदिवासी पळसाच्या पानांच्या द्रोणांमध्ये आपल्या पर्यंत पोहोचवत असतात. असे वनोपज आदिवासींना थोडे पैसे मिळवून देत असतात. पण मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या जंगलतोडीमुळे आणि वनस्पतींच्या होणाऱ्या एकसुरी लागवडीमुळे हा रानमेवा कमी होत चालला आहे. तोरणं, औंट यांसारखी काही फळे तर लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. हाच रानमेवा जंगलातील प्राणी आणि पक्षी यांनाही आकर्षित करत असतो. आजकाल शेतीमधील माकडांचा उपद्रव फार वाढला आहे. कारण जंगलात त्यांच्यासाठी पुरेसे अन्न नाही. अशावेळी त्यांना रानमेवा उपलब्ध झाला तर ते शेतावर धाड घालणार नाहीत. रानमेव्यातील वैविध्य हे आपल्याला अभिमान असलेल्या भारताच्या जैवविविधतेमध्ये लक्षणीय आहे. अशा रानमेव्याला आपण नीट समजून घेऊन त्यांना आपल्या आहारात योग्य स्थान दिले पाहिजे. त्याचबरोबर या वनस्पतींच्या अधिवासांचे संरक्षण होऊन रानमेव्यांच्या वनस्पतींचे संवर्धनही करणे आवश्यक आहे.

(लेखिका भारतीय पारंपरिक आहार संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बिझनेस सेंटर उभारणार! CIDCO चा मोठा प्रकल्प; व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना

IPL 2026: अम्पायरला शिवी दिली! Mumbai Indians च्या दिग्गजावर कारवाई; पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात घातला राडा अन्...

आता पडद्यावर न पाहिलेले सीन्सही दिसणार! 'Dhurandhar 2' OTT वर प्रदर्शित होणार, कधी, कुठे? वाचा

Paper Leak Case: १० लाखांत कुरिअरने आला, १५ लाखांना विकला अन्... महाराष्ट्रात NEET चा पेपर कसा फुटला? धक्कादायक खुलासा

Dunes League T20 : क्रिकेटच्या कक्षा रुंदावतायेत! सौदी अरेबिया फ्रँचायझी लीगच्या मैदानात; युवराज सिंग ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

SCROLL FOR NEXT