कोकण

लोटे येथील खोकेधारकांनी हक्कांसाठी संघटित व्हावे

CD

खोकीधारकांनी हक्कांसाठी संघटित व्हावे
अनंत गिते ः एमआयडीसी अधिकारी आणि व्यावसायिक यांची संयुक्त बैठक
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १५ ः ‘लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत गेल्या ४० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांनी आपल्या उपजीविकेच्या रक्षणासाठी आणि न्याय्य हक्कांसाठी तातडीने संघटना स्थापन करावी. संघटित शक्तीच्या जोरावरच एमआयडीसी प्रशासनाशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढणे शक्य होईल,’ अशी सूचना माजी खासदार अनंत गिते यांनी केली.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील उद्योग भवन येथे आयोजित विशेष चर्चासत्रात ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी एमआयडीसी प्रशासनाने परिसरातील अनधिकृत खोके हटवण्याबाबत व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या होत्या. या कारवाईमुळे छोट्या व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर लोटे आणि आवाशी ग्रामपंचायतींच्या पुढाकाराने एमआयडीसी अधिकारी आणि व्यावसायिक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या आग्रहाखातर अनंत गिते यांनी या बैठकीला उपस्थित राहून व्यावसायिकांशी संवाद साधला. यावेळी गिते म्हणाले, ‘औद्योगिक वसाहतीत कारखाने टिकणे रोजगारासाठी आवश्यक आहेच, पण त्याच वेळी या कारखान्यांवर अवलंबून असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांची चूल विझता कामा नये. ज्यांची उपजीविका पूर्णपणे एका खोक्यावर अवलंबून आहे, अशा खऱ्या गरजू व्यावसायिकांना एमआयडीसीने सहकार्य करणे गरजेचे आहे.’
या बैठकीला लोटे इंडस्ट्रिअल असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राज आंब्रे, सचिव आर. पी. जैन, संचालक राजेश तिवारी, यशवंत जाधव, माजी उपसभापती एस. के. आंब्रे, महेश गोवळकर, पंचक्रोशी पर्यावरण समितीचे अध्यक्ष अशोक जाधव, उदय घाग, पंचायत समिती सदस्य अजय चाळके, रवींद्र गोवळकर, भाजप तालुकाध्यक्ष विनोद चाळके, राजू रेडीज, मनोज आंब्रे, पिंट्या आंब्रे यांच्यासह सुमारे २४० खोकीधारक उपस्थित होते.
----
सक्तीची कारवाई करू नये
एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन श्री. गिते यांनी बैठकीत दिले. तसेच, चर्चा होऊन तोडगा निघेपर्यंत खोकेधारकांवर कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, अशी सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बिझनेस सेंटर उभारणार! CIDCO चा मोठा प्रकल्प; व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना

IPL 2026: अम्पायरला शिवी दिली! Mumbai Indians च्या दिग्गजावर कारवाई; पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात घातला राडा अन्...

आता पडद्यावर न पाहिलेले सीन्सही दिसणार! 'Dhurandhar 2' OTT वर प्रदर्शित होणार, कधी, कुठे? वाचा

Paper Leak Case: १० लाखांत कुरिअरने आला, १५ लाखांना विकला अन्... महाराष्ट्रात NEET चा पेपर कसा फुटला? धक्कादायक खुलासा

Dunes League T20 : क्रिकेटच्या कक्षा रुंदावतायेत! सौदी अरेबिया फ्रँचायझी लीगच्या मैदानात; युवराज सिंग ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

SCROLL FOR NEXT