मुंबई विद्यापीठ उपपरिसरात
प्रवेशपूर्व नोंदणी सुरू
रत्नागिरी, ता. १५ : मुंबई विद्यापीठाच्या पद्मभूषण चरित्रकार धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात नियमित अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व नोंदणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये एम.एस्सी. पर्यावरण विज्ञान (कालावधी २ वर्षे), बी.एस्सी. ऑनर्स (पर्यावरण विज्ञान) (कालावधी १ वर्ष), बी.एस्सी. ऑनर्स विथ रिसर्च (पर्यावरण विज्ञान) (कालावधी १ वर्ष) तसेच एम.एस्सी. सेंद्रिय रसायनशास्त्र (कालावधी २ वर्षे) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पी-६१, एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी येथे संपर्क साधावा. तसेच https://muadmission.samarth.edu.in या लिंकवर जाऊन नोंदणी करून ठेवावी, असे आवाहन उपपरिसराचे संचालक डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.