26O43608
एआय चित्र
लोक अदालतीत चार हजारे प्रकरणे निकाली
पक्षकारांचा प्रतिसाद ; त्वरित अन् सुलभ न्यायाचा उद्देश सफल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : न्यायालयातील प्रलंबित वादांमधून पक्षकारांची सुटका करून त्यांना त्वरित आणि सुलभ न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या अदालतीला पक्षकारांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, जिल्ह्यात तब्बल ४ हजार ३२६ प्रकरणांचा सामोपचाराने निकाल लावण्यात आला आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय रत्नागिरीसह सर्व तालुका न्यायालयांमध्ये नुकत्याच झालेला. राष्ट्रीय लोक अदालत उत्साहात झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध न्यायालयांमधील प्रलंबित ३ हजार ८७२ प्रकरणे लोक अदालतीसमोर ठेवण्यात आली होती. तसेच वाद दाखलपूर्व १५ हजार ३४० प्रकरणांचाही समावेश करण्यात आला होता. लोक अदालतीत ठेवण्यात आलेल्या प्रलंबित प्रकरणांपैकी १५२ प्रकरणे सामोपचाराने व तडजोडीने निकाली काढण्यात आली. तर वाद दाखलपूर्व ठेवलेल्या प्रकरणांपैकी तब्बल ४ हजार १७४ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन तोडगा निघाला, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आर. आर. पाटील यांनी दिली. लोक अदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा न्यायालयातील कर्मचारी, तालुका विधी सेवा समित्यांतील न्यायाधीश व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
----
या प्रकरणात तडजोडीने काढला मार्ग
राष्ट्रीय लोक अदालतीला वकीलवर्ग, पक्षकार तसेच संबंधित विभागांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी खटले, धनादेशविषयक प्रकरणे, वैवाहिक वाद, बँका व पतसंस्थांची थकबाकी, वीजबिले, टेलिफोन बिले आदी विविध प्रकारच्या प्रकरणांमध्ये तडजोडीने मार्ग काढण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.