गंधकुटी बुद्धविहाराचे आज लोकार्पण
जाकादेवी, ता. १५ ः रत्नागिरी तालुक्यातील विल्ये येथे नव्याने उभारण्यात आलेल्या गंधकुटी बुद्ध विहाराचे उद्घाटन व बुद्ध विहाराचे लोकार्पण उद्या (ता. १६) सकाळी १० वाजता भंते डॉ. सुमेध बोधी व भिक्खू संघ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उदय कांबळे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष अनंत जाधव, तालुकाध्यक्ष सुनील पवार, पाली पाथरट धम्मपदेस विपश्यना कोंकण सेंटरचे समन्वयक संतोष आयरे, बौध्दजन पंचायत समितीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पवार, सरपंच स्वप्निल देसाई, उपसरपंच अभिषेक कांबळे, पोलीस पाटील रमेश कांबळे यांसह विविध गाव शाखांचे पदाधिकारी, महिला मंडळ, ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.