43613
43614
rat१५p१२.jpg
४३५७९
फळांनी लगडलेले नारळाचे झाड
rat१५p१३.jpg
४३५८०
सुपारी बाग
------------
हवामान बदलाने सुपारी - नारळही अडचणीत
पीक विमा मिळायला हवा; पंचायत समितीचा ठराव, अवकाळी पावसानेन नुकसान
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ : कोकणाची ओळख असलेल्या हापूस आंबा आणि काजू पिकाला हवामान बदलाचा मोठा फटका बसत आहे. पर्याय म्हणून अनेक शेतकरी शाश्वत उत्पन्नासाठी सुपारी बागायतीकडे वळले होते; मात्र आता सुपारी आणि नारळ पिकाची स्थितीही बिकट झाली असून उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, आंबा-काजू पिकाप्रमाणेच सुपारी आणि नारळ पिकालाही पीक विमा संरक्षण मिळावे, असा महत्त्वपूर्ण ठराव राजापूर पंचायत समितीच्या आढावा बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.
सभापती नंदिनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसभापती अभिजीत गुरव यांच्या उपस्थितीत पंचायत समितीची आढावा बैठक झाली. ‘दै. सकाळ’ने काही दिवसांपूर्वी मांडलेल्या सुपारी-नारळ बागायतदारांच्या व्यथा अन् समस्यांवर सभागृहात विशेष चर्चा झाली. सदस्य श्री. गुरव यांनी आंबा-काजू पिकाप्रमाणे सुपारी-नारळ पिकालाही पीकविमा संरक्षण मिळाले, तर त्याचा परतावा बागायतदारांना मिळेल असा मुद्दा मांडला. तसेच त्यांनी ठराव सादर केला. त्याला सर्वानी मंजूरीही दिली. सुपारी आणि नारळ बागायतदारांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून त्या नुकसानीचे सर्व्हेक्षण व्हावे आणि बागायतदारांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणीही गुरव यांनी केली. पंचायत समितीच्या ठरावामुळे कोकणातील सुपारी-नारळ पिकाला पिक विमा संरक्षण मिळण्यासाठीचे पहिले पाऊल ठरले आहे.
-------
चौकट १
दृष्टिक्षेपात सुपारी पीक
* कोकण विभाग सुपारी क्षेत्र ः ५ हजार हेक्टर
* सुपारी उत्पादन ः पावणेपाच लाख मेट्रिक टन
* कोकण विभागासाठी आवश्यक ७ लाख मेट्रिक टन
* रत्नागिरीतून कर्नाटकासह दक्षिण भारतातून येते
* सरासरी वार्षिक उलाढाल २३ हजार ७५० कोटी रुपये
-------
चौकट २
सुपारी उत्पादन घटण्याची कारणे
* सातत्याने अतिवृष्टी अन् वादळे
* बदलते हवामान अन् वाढते तापमान
* बुरशी अन् किडरोगाचा प्रादुर्भाव
* माकडांचा त्रास
* फळगळती
* मनुष्यबळाचा अभाव
------------
चौकट ३
दृष्टीक्षेपात नारळ पिक
* रत्नागिरी जिल्हा नारळ क्षेत्र ः ५ हजार ६५६ हेक्टर
* वर्षभर उलाढाल ः २० ते २२ लाख फळ नग
* रत्नागिरी जिल्हा नारळ उत्पादन ः ४ लाख ६ हजार फळ नग
* किती उत्पादन वाढविण्याची गरज ः १६ लाख फळ नग
* रत्नागिरीतून कुठून येतात नारळ ः महाराष्ट्राच्या विविध भागासह केरळ, तामिळनाडू
-----------------
चौकट ४
नारळ उत्पादन घटण्याची कारणे
* सातत्याने अतिवृष्टी अन् वादळे
* किडरोगाचा प्रादुर्भाव
* खत व्यवस्थापनाच्या योग्य नियोजनाचा अभाव
* बदलते हवामान
* माकडांचा त्रास
* फुलोरा अन् फळगळती
-------------
कोट
नारळ, सुपारीवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. मोठ्याप्रमाणात फळगळतीही होत आहे. कमी उत्पादन, व्यवस्थापनावर होणारा वाढता खर्च आणि तुलनेमध्ये कमी उत्पन्न अशी बागायतदारांची व्यथा आहे. या नुकसानीचे सर्व्हेक्षण होवून शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी. तसेत या पिकांना पिक विमा संरक्षण मिळाले तर फायदा होईल.”
- राजेश गुरव, सदस्य, पंचायत समिती, राजापूर
--------------
कोट २
मागील दशकात वातावरणातील बदलांमुळे हापूस आंबा व काजू पिक अडचणीत आले आहे. त्यामुळे हवामान बदलाचा कमी परिणाम होणार्या आणि वर्षाकाठी दोनवेळा हमखास उत्पन्न मिळवून देणार्या सुपारी बागायतींकडे शेतकरी वळत आहे. मात्र, सुपारीवरही बदलत्या वातावरणाचा परिणाम होत आहे. तीच स्थिती नारळ पिकाचीही आहेत. त्यामुळे बागायती विकसित करण्यासाठी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते फेडताना अडचणी येत आहेत. हे लक्षात घेऊन पिक विमा संरक्षण मिळावे.
- संतोष पाटील, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.