कोकण

ऑनलाईन औषध विक्रीचा काळ्या फिती लावून निषेध

CD

swt1514.jpg

सावंतवाडी : दुकानांतील मालक, फार्मासिस्ट आणि कर्मचारी हाताला काळ्या फिती लावून आपला निषेध नोंदवत आहेत.

ऑनलाईन औषध विक्रीचा
काळ्या फिती लावून निषेध
सावंतवाडीतून सुरूवात : २० मे रोजी कडकडीत बंद पाळणार‌
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ : ऑनलाईन औषध विक्रीला विरोध, कॉर्पोरेट कंपन्यांची शोषणात्मक किंमत धोरणे आणि बनावट औषधांचा धोका याविरुद्ध अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने देशव्यापी लढा पुकारला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २० मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते २४ तासांचा कडकडीत बंद पाळणार‌ असून आजपासून येथे काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आला.
तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. आजपासून १९ मेपर्यंत सर्व औषध दुकानांतील मालक, फार्मासिस्ट आणि कर्मचारी हाताला काळ्या फिती लावून काम करत आपला निषेध नोंदवत आहेत. १९ मेच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते २० मेच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहे. ऑनलाईन औषध विक्रीवर त्वरित बंदी घालावी, २६ मार्च २०२० ची अधिसूचना केंद्र सरकारने मागे घ्यावी, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून राबवली जाणारी अवास्तव डिस्काउंट धोरणे बंद व्हावीत, बनावट औषधांच्या विक्रीपासून देशातील जनतेला वाचवावे आदी मागण्या यानिमित्ताने करण्यात आल्यात.‌ यावेळी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने या संदर्भात पंतप्रधानांना निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हा बंद पुकारण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. औषध विक्रेत्यांचे हे आंदोलन देशहितासाठी आणि रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आहे, अस मत सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष आनंद रासम यांनी व्यक्त केले आहे. दुकाने बंद राहणार असली तरी आपत्कालीन स्थितीत रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी संघटनेने खबरदारी घेतली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT