दापोलीच्या वाहकाला मारहाण, तिघांवर गुन्हा
दापोली, ता .१५ ः येथील एसटी स्थानकाच्या मागील बाजूस उर्दू शाळेजवळ बाजू देण्याच्या कारणावरून एसटी चालक व वाहकाला अडवून शिवीगाळ करत वाहकाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता. १३) दुपारी घडली. या प्रकरणी तिघांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवनाथ बन्शी नाकाडे (वय ३४, सध्या रा. काळकाई कोंड, दापोली) हे एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी ते चालक आशिष रामचंद्र मळेकर यांच्यासमवेत एसटी बस घेऊन कोंडे-करजांळी येथून दापोलीकडे येत होते. दुपारी दापोली एसटी स्थानकाच्या मागील बाजूस उर्दू शाळेजवळ बाजू देण्याच्या कारणावरून बस अडवून संशयितांनी चालकाला शिवीगाळ केली. संशयितांनी वाहक शिवनाथ नाकाडे यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी शेखर चंद्रकांत कालेकर (वय ४५), रंजित राजेंद्र यादव (वय १९) आणि साहिल इरशाद शार्दुला (वय १९, सर्व रा. दापोली) यांच्याविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार केल्याच्या रागातून महिलेला मारहाण
चिपळूण ः घराशेजारी असलेल्या पोल्ट्री फार्मबाबत तक्रार केल्याच्या रागातून एका वृद्ध महिलेला कौलाने मारहाण करून जखमी केल्याची घटना चिपळूणमधील कापसाळ मधलीवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापसाळ मधलीवाडी येथील रहिवासी पूजा राजेंद्र कडवईकर (वय ६५) यांनी त्यांच्या घराशेजारी असलेल्या संदेश हरिश्चंद्र साळवी यांच्या पोल्ट्री फार्मबाबत तक्रार केली होती. या तक्रारीचा राग मनात धरून १४ मे रोजी दुपारी संशयित संदेश साळवी याने फिर्यादी पूजा कडवईकर यांना घरातील कौल उचलून मारला. त्यामध्ये त्या जखमी झाल्या. मारहाणीच्या या घटनेदरम्यान संशयित साधना बळीराम साळवी आणि दीपाली बळीराम साळवी यांनी पूजा यांचा मुलाचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच, चौथे संशयित मधुकर सदाशिव साळवी यांनी पूजा यांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर जखमी कडवईकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदेश हरिश्चंद्र साळवी, साधना बळीराम साळवी, दीपाली बळीराम साळवी आणि मधुकर सदाशिव साळवी यांच्यावर गुन्हा नोंदवल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.