कोकण

काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत फके यांचे निधन

CD

-rat15p18.jpg-
26O43642
यशवंत फके
-------

काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते
यशवंत फके यांचे निधन
आठ दिवसांपूर्वी झाली होती मारहाण ; उपचारानंतर होते घरी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ ः काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व कुणबी समाजाचे नेते यशवंत कृष्णा फके (वय ७३) यांचे आज निधन झाले. आठ दिवसांपूर्वी शहरातील ओझरवाडी शंकर मंदिरसमोर राखणेच्या मानाच्या ताटावरून झालेल्या वादविवादातून त्यांना मारहाण झाली होती. या मारहाणीत ते गंभीररीत्या जखमी झाले होते. उपचारानंतर ते घरी विश्रांती घेत होते. २९ एप्रिलला दुपारी ओझरवाडी येथे फके यांना चौघांकडून मारहाण झाली होती. त्यांच्यावर चिपळुणातील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस ते ओझरवाडी येथील आपल्या घरी विश्रांती घेत होते. मात्र, शुक्रवारी सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा अचानक मृत्यू झाला.
पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर कामथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. हे समजताच त्यांचे नातेवाईक व ओझरवाडीतील नागरिक कामथे रुग्णालय येथे जमले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र, त्यानंतर प्रकरण शांत झाले आणि नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. दुपारी रामतीर्थ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

SCROLL FOR NEXT