कोकण

रणरणत्या उन्हात क्रिकेट बेतले जीवावर

CD

43645
सुभाष गिरकर


रणरणत्या उन्हात क्रिकेट बेतले जीवावर

कट्टा गुरामवाड येथे क्रिकेटपटूचा मैदानावर मृत्यू


सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १५ : सध्या संपूर्ण राज्यात उष्माघाताची प्रचंड लाट पसरलेली असून, प्रशासनाने नागरिकांना दुपारच्यावेळी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अशा कडक उन्हात क्रिकेट खेळणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील कट्टा गुरामवाड येथील काराणेवाडी मैदानावर घडली आहे. टेनिस बॉल क्रिकेट सामन्यादरम्यान बुधवारी दुपारी १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास सुभाष दत्तात्रय गिरकर (वय ४५) हे खेळत असताना अचानक अत्यवस्थ होऊन मैदानावर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कडक उन्हात सामना सुरू असताना सुभाष गिरकर यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते मैदानावरच कोसळले. उपस्थित मित्रपरिवार आणि आयोजकांनी त्यांना तात्काळ पेंडूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना कुडाळ येथील एका खासगी रुग्णालयात नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
सुभाष हे कट्टा बाजारपेठ येथील रेशनिंग दुकानावर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. अत्यंत नम्र आणि मनमिळाऊ स्वभावाचे असलेल्या सुभाष यांनी रेशनिंग दुकानावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला, विशेषतः वयोवृद्धांना नेहमी आपुलकीने मदत केली. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या मागे पत्नी, लहान मुलगा आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यांची पत्नी विद्या गिरकर या वरची गुरामवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत, तर मुलगा वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. गुरुवारी स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
-----
कडक उन्हात सामने का?
या दुर्दैवी घटनेनंतर तालुक्यातील नागरिकांमधून तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. शासनाने उष्माघाताचा इशारा दिला असतानाही मे महिन्याच्या अशा कडक उन्हात दुपारच्यावेळी सामने भरवण्याची गरज होती का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. क्रिकेट सामने भरविलेच नसते तर कदाचित हा अनर्थ टळला असता आणि एका निष्पाप व्यक्तीचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

SCROLL FOR NEXT