कोकण

जनगणनेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

CD

43659

जनगणनेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना साहित्य वितरण

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ : देशाच्या विकासाचा पाया मानल्या जाणाऱ्या जनगणना २०२७ प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला वेग दिला असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. आगामी जनगणना प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
जनगणना ही केवळ लोकसंख्येची आकडेवारी मोजण्याची प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचा आरसा मानली जाते. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, निवास, ग्रामीण विकास तसेच विविध शासकीय योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी करताना जनगणनेतील माहिती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे प्रत्येक माहिती अचूक आणि विश्वासार्ह स्वरूपात संकलित होणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमांतर्गत जनगणना कर्मचाऱ्यांना आवश्यक बॅग, कागदपत्रे, नोंदवही तसेच विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. आगामी काळात घरगणना आणि माहिती संकलन प्रक्रिया अधिक सुलभ व प्रभावी करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे यावेळी नमूद केले.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी जनगणना कार्यात शिस्त, समन्वय, वेळेचे नियोजन आणि जबाबदारीची भावना अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. प्रत्येक घरापर्यंत पोहोचून नागरिकांची अचूक माहिती संकलित करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांनी दक्षतेने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रशासन, महसूल विभाग आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून जनगणना २०२७ प्रक्रिया यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रशासनाच्या कार्यतत्परतेमुळे जनगणनेची पूर्वतयारी आता अधिक वेगाने आणि प्रभावीपणे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. डेगवे,असनिये,घारपी, पडवे, पडवे माजगाव, तांबुळी या गावातील प्रगणकांना सुवरवायझर महेश आंदूर्लेकर यांनी साहित्य वितरण केले. यावेळी प्रगणक जे. डी. पाटील, भारत बांदेकर, भास्कर राठोड, सुनिल गवस आदी प्रगणक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT