वेंगुर्लेत २० मे रोजी
शोभायात्रा, चित्ररथ स्पर्धा
वेंगुर्ले, ता. १५ : येथील पालिकेच्या शतकोतर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग व कला व संस्कृती संचालनालय यांच्यावतीने शहरात २० मे रोजी भव्य शोभायात्रा व चित्ररथ स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती वेंगुर्ले नगर पालिकेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली.
कला व संस्कृती खात्याचे मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ल्यात २० ते २२ मे दरम्यान भव्य ‘स्वच्छता व सांस्कृतिक’ महोत्सवाचे आयोजन केले आहे. या तीन दिवशीय महोत्सवात स्वच्छता व भारतीय संस्कृतीला अधोरेखित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने विविध कार्यक्रम, स्पर्धा व सामाजोपयोगी उपक्रामांचे नियोजन पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांचाही सहभाग घेण्यात येत आहे, असेही नगराध्यक्ष म्हणाले.
या महोत्सवाचा शानदार प्रारंभ २० मे रोजी भव्य शोभायात्रेने होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता सुरू होणाऱ्या शोभायात्रेत भारतीय संस्कृतीवर आधारित विविध देखावे सादर केले जाणार आहे. देवगड येथील ढोल पथक, जिल्ह्यातील नामांकित लेझीम पथक, समईनृत्य पथक, वारकरी संप्रदायाची भजनवारी, शिमग्यातील विविधरंगी ढंगी सोंगे, अध्यात्मिक कथानकातील विविध पौराणिक पथके, देवदेवतांचे देखावे आदींचा शोभायात्रेत सहभाग असणार आहे. वेंगुर्ले शहराचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला साकडे घालून दाभोलीनाका येवून या शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. दाभोली नाका, वेंगुर्ले बाजार, हॉस्पीटलनाका मार्गे कॅम्प मैदानावरील महोत्सवस्थळी ही शोभायात्रा पोहोचणार आहे. याच शोभायात्रेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलापथकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ''भारतीय संस्कृती'' या विषयावर आधारित भव्य चित्ररथ स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.