कोकण

उन्हवरेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

CD

उन्हवरेतील विद्यार्थ्यांना
शैक्षणिक साहित्य वाटप
गावतळे : दापोली तालुक्यातील उन्हवरे परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावण्याच्या उदात्त हेतूने जागृती मित्र मंडळ (जागृतीवाडी, उन्हवरे) यांच्या वतीने उन्हवरे ग्रुप ग्रामपंचायत येथे मोफत वह्या, छत्र्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मंडळाचे मुंबई अध्यक्ष पांडुरंग लोंढे आणि ग्रामीण अध्यक्ष कृष्णा पानकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उन्हवरे, वावघर, फरारे, देगाव आणि गोविंदशेत पांगारी येथील एकूण १० शाळांमधील विद्यार्थी तसेच स्थानिक अंगणवाड्यांमधील बालकांना मोफत वह्या, छत्र्या आणि शैक्षणिक भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सदानंद रसाळ यांनी भूषविले. या प्रसंगी विविध शाळांचे मुख्याध्यापक, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोलंबडे, ग्रुप ग्रामपंचायत सरपंच प्राची पवार, शिवसेना विभागप्रमुख मोहन भागणे, उपसरपंच महेश जावळे आणि पोलीस पाटील शैलेश लोंढे यांनी उपस्थित राहून मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT