कोकण

प्रौढ दिव्यांगासाठी मिरजेत प्रशिक्षण

CD

प्रौढ दिव्यांगांसाठी
मिरजेत प्रशिक्षण केंद्र
रत्नागिरी : महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण आयुक्तालय (पुणे) आणि जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह (मिरज) या संस्थेमध्ये २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रौढ दिव्यांगांना मोफत निवासी प्रशिक्षण देणारी ही पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था असून, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांसाठी राहण्याची, जेवणाची आणि प्रशिक्षणाची संपूर्ण व्यवस्था मोफत केली जाईल. संस्थेमध्ये अद्ययावत संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टिकल्स, नेटवर्किंग आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. अनुभवी व तज्ज्ञ निदेशकांद्वारे हे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी ‘बीज भांडवल योजना’ देखील उपलब्ध करून दिली जाते. प्रवेश अर्ज आणि माहितीपत्रक संस्थेच्या पत्त्यावर समक्ष किंवा पोस्टाद्वारे मोफत मिळतील. अधिक माहितीसाठी सांगली मिरज येथील शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात संपर्क साधावा, असे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.


कोकरे गटाची
असुर्डेत सभा
चिपळूण ः तालुक्यातील कोकरे जिल्हा परिषद गटाची प्रभाग समितीची बैठक जिल्हा परिषद सदस्य संजय कदम यांच्या उपस्थितीत झाली. सभेत शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, पाणी पुरवठा, आरोग्य, महिला बालकल्याण, पशुसंवर्धन, कृषी तसेच एस. टी. महामंडळ विभागाच्या समस्या बाबत चर्चा करण्यात आली. यातील अडीअडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हास्तरावर किंवा तालुका स्तरावरील प्रश्न समजून घेऊन त्या सोडविण्याबाबत योग्य ते प्रयत्न केले जाणार असल्याचे समिती अध्यक्ष संजय कदम सांगितले व तसे ठराव केले. जनतेचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, कामात दिरंगाई केल्यास योग्य कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही कदम यांनी दिला. या बैठकीला प्रभाग समितीच्या उपाध्यक्ष उज्ज्वला घाग, पंचायत समिती सदस्या मनस्वी बैकर, समिती सचिव राज अहम्मद देसाई, पाणी पुरवठा विभाग उपअभियंता डॉ. दिगंबर पाटील, असुर्डे सरपंच पंकज साळवी, खेरशेत उपसरपंच नागेश साळवी, हडकणी सरपंच नितीन सावंत, तळवडे सरपंच दूर्वा विचारे, आंबतखोल सरपंच आत्माराम बांबाडे आदी उपस्थित होते.


रिक्षाचालकांना
रेनकोटचे वाटप
रत्नागिरी : पावसात स्वतः भिजून प्रवाशांना सुरक्षित सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांसाठी एक छोटासा मदतीचा हात या भावनेतून रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षाचालकांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. परशुराम कदम, केदार देसाई, मयूर कदम, मिलिंद, ऋषी, आदेश आणि अविनाश कदम यांच्या हस्ते रेल्वे स्टेशन येथील रिक्षा स्टँडवर जाऊन सर्व रिक्षाचालकांना हे रेनकोट सुपूर्द करण्यात आले. कोकणात मॉन्सूनचा पाऊस अत्यंत तीव्र असतो. अशाही परिस्थितीत प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी रिक्षाचालक अहोरात्र रस्त्यावर असतात. अनेकदा स्वतः भिजून ते इतरांना संरक्षण देत असतात. हीच गोष्ट विचारात घेऊन या सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येत रिक्षाचालकांना हक्काचे पावसाळी कवच उपलब्ध करून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये दमदार पावसाची हजेरी

Forest Crackdown: सुधागडात खैर तस्करीवर वनविभागाचा धडाकेबाज छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जण अटकेत

SCROLL FOR NEXT