कोकण

दोडामार्गनंतर आता किनारपट्टी दिल्‍ली लॉबीच्या घशात

CD

swt2414.jpg
46333
परशूराम उपरकर

आता किनारपट्टी दिल्‍ली लॉबीच्या घशात
परशूराम उपरकर : विनाशकारी प्रकल्‍पांविरोधात लढा देणार
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २३ : दोडामार्ग नंतर आता संपूर्ण किनारपट्टी दिल्‍ली लॉबीच्या घशात घालण्याचे कारस्थान सध्या सुरू आहे. दुसरीकडे अणुउर्जा सारखे विनाशकारी प्रकल्‍प सिंधुदुर्गात आणून कोकण उध्वस्थ केला जात आहे. यात पालकमंत्र्यासह सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. मात्र आम्‍ही कोकण नष्‍ट होऊ देणार नाही. दिल्‍ली लॉबी विरोधात तसेच विनाशकारी प्रकल्‍पांच्या विरोधात शिवसेना लढा उभा करणार असल्‍याचे प्रतिपादन शिवसेना नेते आणि माजी आमदार परशूराम उपरकर यांनी आज केले.
येथील संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, सिंधुदुर्ग विकणे आहे अशी पत्रके शिवसेनेचे तत्‍कालीन जिल्‍हाप्रमुख डी. डी. देसाई यांनी वाटली होती. त्‍यावेळी त्‍यांची थट्टा झाली. पण कोकणात होत असलेले परप्रांतीयांचे आक्रमण त्‍यांनी वेळीच ओळखले होते. त्‍यावेळी ॲड. देसाई यांची अनेकांनी थट्टा उडवली. पण सध्या ते घडताना दिसत आहे. याला मुख्यत: राणे कुटुंबीय जबाबदार आहे. मोठमोठे प्रकल्‍पाच्या नावाखाली इथल्‍या जमिनी परप्रांतियांच्या घशात घालण्यासाठी त्‍यांनी सहकार्य केले होते. तोच कित्ता आता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून गिरवला जात आहे.
आत्तापर्यंत फक्‍त दोडामार्ग तालुका रबर लागवडीच्या नावाखाली केरळीयांच्या ताब्‍यात होता. मात्र आता सावंतवाडीसह वेंगुर्लेतील खनिजपट्ट्यांसह मालवण, देवगडची किनारपट्टी आणि त्‍या लगत असलेल्‍या गावांतील जागा दिल्‍ली लॉबीच्या घशात घालण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातूनच हे प्रकार सुरू आहेत. कोकणच्या दुदैवाची बाब म्‍हणजे दिल्‍ली लॉबीला राज्‍यकर्त्यांचे संरक्षण देखील लाभले आहे.

कोट
सिंधुदुर्ग म्‍हणजे पर्यटन जिल्‍हा अशी जिल्ह्याची नवी ओळख निर्माण झाली होती. मात्र तो भास ठरावा अशी परिस्‍थिती आणली जात आहे. देवगड, मुणगे परिसरात महाकाय अणुउर्जा प्रकल्‍प आणले जात आहेत. या प्रकल्‍पांमुळे कोकणातील निसर्ग धोक्‍यात येणार असून इथले तरूण जिल्‍हा बाहेर फेकले जाणार आहेत. मात्र या सर्व घातक प्रकल्‍पांना, दिल्‍ली लॉबीच्या विरोधात शिवसेना लढा देणार आहे. लवकरच देवगडात अणुउर्जा प्रकल्‍पाविरोधात जनआंदोलन उभे राहणार आहे. त्‍या लढ्यात शिवसेन देखील उतरणार आहे. कोकणात विनाशकारी प्रकल्‍प आम्‍ही होऊ देणार नाही.
- परशूराम उपरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

Hot Showers For Hairwash: गरम पाण्याने केस धुणं चांगलं की वाईट? सेलिब्रिटी हेअरस्टाइलिस्टने सांगितलं खरं उत्तर

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT