कोकण

नादुरुस्त प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्यांसाठी निधी मिळणार

CD

swt2415.jpg
46334
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती संतोष साटविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

नादुरुस्त प्रधानमंत्री ग्रामसडक
रस्त्यांसाठी निधी मिळणार
बांधकाम समिती सभा : शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठराव
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २४ : दहा वर्षे पूर्ण झालेल्या आणि नादुरुस्त असलेल्या प्रधानमंत्री ग्रामसडकचे रस्ते दुरुस्तीसाठी निधी मिळावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा, असा ठराव आजच्या बांधकाम समिती सभेत घेण्यात आला.
जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती संतोष साटविलकर, समिती सचिव तथा कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, रुपेश कानडे, केशव नारकर, संजय बोबडी, दीपलक्ष्मी पडते, सूदन कवठणकर उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अनेक रस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे. ज्या रस्त्यांना दहा वर्षे पूर्ण झाली आहेत अशा नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी ठराव करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. असे आदेश सभापती संतोष साटविलकर यांनी सभेत दिले.
बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी दिलेली फाईल किती टेबलवर फिरते, त्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो अशी माहिती सदस्यांनी मागील सभेत मागितली होती. यावर चर्चा होऊन केवळ बांधकाम विभागाकडील कामाच्या माहिती द्यावीच, त्याशिवाय सर्वच विभागांच्या फाईल किती टेबलावर फिरतात आणि मंजूरीसाठी किती दिवस लागतात याची माहिती पुढील सभेत द्यावी अशी सूचना सभापती संतोष साटविलकर यांनी सभेत केली. जिल्ह्यात किती शाळा नादुरुस्त आहेत त्याची माहिती मागील सभेत सदस्यांनी मागितली होती. मात्र ही माहिती न मिळाल्याने आणि दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. पुढील सभेत योग्य पद्धतीने माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

चौकट
नव्याने उद्घाटन झालेल्या पुलावरील भराव खचला
कुडाळ तालुक्यातील कुंदे ते आंब्रड रस्त्यावरील नव्याने बांधलेल्या पुलावरील भराव पाहिल्याच पावसात खचला आहे. याबाबत आंब्रड जिल्हा परिषद मतदार संघाच्या सदस्या दीपलक्ष्मी पडते यांनी सभागृहाचे लक्ष वेधत या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी सूचना केली. तर संबंधित ठेकेदाराला वेळीच खचलेला भराव सुस्थितीत करून देण्याच्या सूचना करावी, असे आदेश सभापतींनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT