कोकण

लांजा शहरात चिखलाचे साम्राज्य

CD

rat२४p५.jpg-
26O46298
लांजा ः लांजा शहरात उड्डाणपुलाखाली चिखल साचलेला आहे.

चिखलामुळे लांजावासीय हैराण
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २४ : पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील उड्डाणपुलाच्या पिलरखालील माती काढण्याचा अट्टहास राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने केला आहे. याचा फटका सोमवारी झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात संपूर्ण शहराला बसला असून, लांजा हायस्कूल ते थेट बसस्टँडपर्यंत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. या चिखलातून वाट काढताना शालेय विद्यार्थी आणि नागरिक पुरते हैराण झाले होते.
लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे; मात्र, पावसाळा तोंडावर आलेला असताना ठेकेदाराने गटार खोदाई आणि सेवारस्त्याची कामे अर्धवट स्थितीत हाती घेतल्याने लांजावासियांना अगोदरच मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. त्यातच आणखी भरीस भर म्हणून ठेकेदाराने उड्डाणपुलाखाली असलेला मातीचा भराव काढून सपाटीकरण करण्याचे काम सुरू केले. पावसाळा अगदी तोंडावर असताना अशा प्रकारचे काम हाती घेतल्याने सोमवारी झालेल्या पावसात उड्डाणपुलाखालील माती संपूर्ण रस्त्यावर पसरली. महामार्गावरून सातत्याने होणाऱ्या वाहनांच्या सुसाट रहदारीमुळे हा चिखल आणखीनच पसरला आणि संपूर्ण महामार्ग चिखलात माखून गेला. या चिखलातून पायी चालताना शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. कपडे आणि पादत्राणे चिखलाने खराब होत असल्याने ‘नेमके चालायचे कुठून आणि कसे?’ असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. ठेकेदाराच्या या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभाराविरोधात लांजा शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

Mumbai News: कारवाई रोखण्यासाठी कट, न्यायाधीशांचीच मारली सही; न्यायालयाचा धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

Daund Municipal Outrage: दौंड नगरपालिकेत कंत्राटदार ‘गब्बर’कडून महिला अधिकार्याचा विनयभंग; सर्वांसमोर अश्लील हावभाव

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

SCROLL FOR NEXT