वेंगुर्लेत रविवारी
गुणवंत गौरव
वेंगुर्ले ः नगरवाचनालय वेंगुर्ले संस्थेतर्फे विविध देणगीदारांनी दिलेल्या देणगीतून प्राथमिक, माध्यमिक शालांत परीक्षा, उच्च माध्यमिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (ता. 28) सकाळी 10 वाजता संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगावकर सभागृहात प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांच्या हस्ते आयोजित केला आहे. ''सुदत्त कल्याणनिधी'' संस्थेने दिलेल्या देणगीतून सुमित्रा मंत्री स्मृती व्यासंगी वाचक पुरस्काराचेही वितरण होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन वेंगुर्ले नगरवाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.
सावंतवाडीत उद्या
''नांदी ते भैरवी''
सावंतवाडी ः पन्नास वर्षे नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्या नटश्रेष्ठ बालगंधर्वांच्या जयंतीनिमित्त येथील ''क्षितिज इव्हेंट'' या संस्थेने शुक्रवारी (ता. 26) सायंकाळी 5.30 वाजता आरपीडी हायस्कूल, सावंतवाडी येथे बालगंधर्वांच्या संगीतमय जीवनप्रवासावर आधारित ''बालगंधर्व-नांदी ते भैरवी'' या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची निर्मिती श्री परमेश्वर प्रोडक्शनची असून कार्यक्रमाची संकल्पना आणि संहितालेखन बाळ पुराणिक यांनी केले आहे. बालगंधर्वांचा जन्म, त्यांचा रंगभूमीवरील प्रवेश, त्यांनी केलेल्या भूमिका, त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग, त्यांची लोकप्रिय गाणी आणि त्यांचा उत्तरार्ध असा पूर्ण जीवनप्रवास या कार्यक्रमातून मांडण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचे प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक आणि नाट्यअभिनेते स्वप्नील गोरे, गायिका राधा जोशी सहभागी होणार आहेत. त्यांना संगीत साथ ऑर्गन-प्रसाद शेवडे, तबला-अभिनव जोशी आणि मंजिरी साथ तेजस प्रभूदेसाई करणार आहेत. निवेदन बाळ पुराणिक, उमा जडये करणार आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सेवानिवृत्त सैनिक
संघाची रविवारी सभा
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघ, कार्यालय सावंतवाडी या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. 28) सकाळी 10.30 वाजता येथील आरपीडी हायस्कूल सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.