कोकण

आजारांना नियंत्रणासाठी ''स्टॉप डायरिया अभियान''

CD

डायरियाविरोधात विशेष मोहीम
जिल्हा परिषद; प्रत्येक गावात करणार जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः पावसाळ्यात अशुद्ध पाणी आणि स्वच्छतेच्या अभावामुळे वाढणाऱ्या अतिसारजन्य (डायरिया) आजारांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत ‘स्टॉप डायरिया अभियान २०२६’ राबवण्यात येत आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि लोकसहभागाच्या जोरावर अतिसाराचा प्रादुर्भाव रोखणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात अतिसार आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पाणी आणि स्वच्छताक्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाची माहिती देताना त्या म्हणाल्या, जिल्ह्यातील ग्रामपंचायती, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना थेट मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रत्येक गावात पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी केली जाणार असून, विद्यार्थी व स्वयंसेवकांना ‘फिल्ड टेस्ट कीट’द्वारे पाणी परीक्षणाचे प्रशिक्षण दिले जाईल. ग्रामीण भागातील गळती असलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करणे, पाणी साठवण टाक्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे आणि नियमित क्लोरिनीकरणावर विशेष भर दिला जाईल. नळाद्वारे पुरवण्यात येणाऱ्या पाण्यात किमान ०.२ PPM मुक्त अवशिष्ट क्लोरिन राखले जात असल्याची खात्री करा, असे निर्देश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या मोहिमेवेळी नागरिकांमध्ये साबणाने हात धुण्याचे महत्त्व, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा वापर, अन्न हाताळताना घ्यावयाची काळजी आणि अतिसार प्रतिबंधाबाबत जागृती केली जाणार आहे तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे आणि पाण्याचे उद्‍भवू स्वच्छ ठेवावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
-------
कोट
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्याची हागणदारीमुक्त स्थिती कायम राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. गावस्तरावर स्वच्छतामोहीम राबवून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट यावर भर दिला जाईल.
- सागर पाटील, प्रकल्प संचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IB ला मिळाले नवे बॉस! काश्मीरमध्ये मोठी जबाबदारी सांभाळलेले IPS महेश दीक्षित आता देशाच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख

Savitribai Phule Pune University: चांगल्या गुणांनंतरही विद्यार्थी ‘नापास’! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार; ‘बी.कॉम’च्या निकालात घोळ

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात आज राजर्षी शाहू जयंतीचा सोहळा; अनेक ठिकाणी रोषणाई, विविध उपक्रमांद्वारे होणार विचारांचा जागर

FIFA World Cup 2026 मध्ये सर्वात मोठा उलटफेर! इक्वाडोरकडून बलाढ्य जर्मनीचा गेम अन् राष्ट्राध्यक्षांनी थेट सुट्टीच केली जाहीर

Mardi Tragedy: दुर्लक्षामुळे वीज सुरक्षेच्या घोषणा कागदावरच; मार्डी दुर्घटनेतून घेणार का धडा?, निर्ढावलेल्या यंत्रणेवर चाप जरुरीचा

SCROLL FOR NEXT