कोकण

कोल्हापूर ः एसआयएलसी

CD

SIILC च्या लोगोसह वापरावी

कोरियन स्किन-हेअर ट्रीटमेंट सेमिनार
कोल्हापुरात मंगळवारी विशेष कार्यशाळेचे आयोजन
कोल्हापूर : सौंदर्य क्षेत्रात सध्या लोकप्रिय ठरत असलेल्या कोरियन स्किन व हेअर ट्रीटमेंट्सविषयी मार्गदर्शन करणारा विशेष एकदिवसीय सेमिनार कोल्हापूर येथे मंगळवारी (ता. ३० जून) आयोजित केला आहे. आधुनिक स्किन आणि हेअर केअर तंत्रज्ञानाची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्याचा उद्देश या सेमिनारमागे असून, ब्युटी प्रोफेशनल्स, सलून मालक, त्वचा व केसांची निगा राखणारे तज्ज्ञ, तसेच सौंदर्यक्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. या सेमिनारमध्ये तीन प्रकारच्या फेशियल्स आणि दोन प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट्सचे डेमो सादर केले जाणार आहेत. तसेच पिग्मेंटेशन ट्रीटमेंट, ग्रेड १ ते ४ पर्यंतच्या ऍक्ने व्यवस्थापनाच्या पद्धती, केस गळती आणि केस पातळ होण्यावरील आधुनिक उपचार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. यासोबतच सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या ‘ग्लास स्किन’ संकल्पनेमागील तंत्रज्ञान आणि भारतीय त्वचेसाठी त्याची योग्य अंमलबजावणी कशी करावी, याविषयी माहिती दिली जाईल. पिग्मेंटेशन, ॲक्ने, केस गळती आणि अलोपेशिया यांसारख्या समस्यांवर न्यूट्रास्युटिकल्स व सप्लिमेंट्सची भूमिका याचाही आढावा घेतला जाणार आहे. सेमिनारमध्ये सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र तसेच नोट्स देण्यात येणार असून, सौंदर्य क्षेत्रातील आधुनिक ट्रेंड्स समजून घेण्यासाठी ही संधी उपयुक्त ठरणार आहे.

ठिकाण : ‘सकाळ’ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर
संपर्क : ९६०७००२२११, ९९२३८७९४४८, ९८८१३७८१०२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nalasopara Waterlogging : नालासोपारा पश्चिम परिसरात पूरसदृश स्थिती; आमदारांच्या कार्यालयातही शिरले पाणी

Horoscope: पुढच्या 48 तासांत बदलतीये ग्रह दशा! चमकणार 'या' 4 राशींचे नशीब; धनलाभासह मिळतील मोठ्या आनंदाच्या बातम्या

Harbhajan Singh याला NCA मधून का हाकललं होतं? २६ वर्षांनी स्वत:च केला मोठा खुलासा; म्हणाला, 'माझी चूक...'

Marathi News Live Updates : रस्ता खड्ड्यात; टोलवसुली मात्र जोरात! घोटी-पडघा टोल नाक्यावर वाहनचालकांचा संताप

Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! पुढील २-३ तासात पावसाचा जोर वाढणार, आयएमडीचा इशारा

SCROLL FOR NEXT