

Mumbai Rain Update
ESakal
मुंबई : मुंबईतील अनेक भागात सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचत असून रेल्वेसह रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्याचे समोर येत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून मुंबई लोकल ट्रेन सेवा देखील उशिराने सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांचे हाल होत आहेत. अशातच पुढील २-३ तासांत मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.