कोकण

तेंडोली-भोमवाडीत आज ‘गंगा प्रतिज्ञा’

CD

तेंडोली-भोमवाडीत
आज ‘गंगा प्रतिज्ञा’
कुडाळ : तेंडोली-भोमवाडी येथील श्री अनलादेवी कला क्रीडा मंडळातर्फे श्री देवी अनलादेवी मंदिरात उद्या (ता २७) सायंकाळी ७.३० वाजता ‘गंगा प्रतिज्ञा’ हे संयुक्त दशावतार नाटक सादर करण्यात येणार आहे. या नाटकात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कलाकारांचा सहभाग असून नाट्यरसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. नाटकात गणपतीच्या भूमिकेत प्रथमेश मेस्त्री, रिद्धी-सिद्धी म्हणून सखाराम परब, राजा निलध्वज म्हणून आनंद नार्वेकर, प्रवीर म्हणून साहील तळकटकर, मदनमंजिरी म्हणून यश जळवी, श्रीकृष्ण म्हणून आबा कलिंगण, अग्निदेव म्हणून गिरीश राऊळ, ज्वाला म्हणून सिद्धेश मुणनकर, अर्जुन म्हणून संजय काळे, ऋषकेतू म्हणून अक्षय सातार्डेकर, मेघवर्ण म्हणून दत्तप्रसाद तवटे आणि गंगेच्या भूमिकेत गौतम केरकर अभिनय साकारणार आहेत. वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली) यांचे विशेष सहकार्य राहणार आहे.
---
माजगाव येथे उद्या
रक्तदान शिबिर
ओटवणे : जिल्ह्यातील विविध रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने माजगाव मित्रमंडळ आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जूनला रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, माजगाव येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर होणार आहे. जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत व पंचायत समिती सदस्य जितेंद्र (जितू) गावकर यांच्या विशेष सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले असून अधिक माहितीसाठी गिरीश सावंत व ओंकार सावंत यांच्याशी संपर्क साधावा, असे सुरज सावंत, प्रशांत मेस्त्री, ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे आणि खजिनदार सिद्धार्थ पराडकर यांनी सांगितले.
---
श्यामराव काळे
‘व्यासंगी वाचक’
वेंगुर्ले : नगरवाचनालय वेंगुर्ले संस्थेचा यंदाचा ‘व्यासंगी वाचक पुरस्कार’ वेंगुर्ला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक तथा वेंगुर्ला ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष श्यामराव शाहूराव काळे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण समारंभ रविवारी (दि. २८) सकाळी १० वाजता नगरवाचनालयाच्या सभागृहात होणार आहे. कै. श्रीराम मंत्री यांच्या कायम निधीतून सुदत्त कल्याण निधी पुरस्कृत हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो. सन २०२५-२६ या वर्षासाठी वैविध्यपूर्ण वाचन संस्कृती जोपासल्याबद्दल काळे यांची निवड करण्यात आली आहे. गोगटे-वाळके महाविद्यालय, बांदाचे प्राचार्य तथा नाट्यसमीक्षक डॉ. गोविंद काजरेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.
---
परुळेबाजारच्या
उपसरपंचपदी
प्राजक्ता पाटकर
परुळे : परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्राजक्ता प्रसाद पाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच संजय दूधवडकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर झालेल्या निवडणूक प्रक्रियेत प्राजक्ता पाटकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यावेळी माजी सभापती नीलेश सामंत यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन केले. मच्छिमार संघटना अध्यक्ष वसंत तांडेल, वेंगुर्ले खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अविनाश केळजी, सरपंच प्रणिती आंबडपालकर, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------
वेंगुर्लेत २८ पासून
वजनमापे पडताळणी
वेंगुर्ले : शासनाच्या निरीक्षक वैध मापनशास्त्र विभाग, सावंतवाडी यांच्या वतीने २८ ते ३० जून या कालावधीत वेंगुर्ले शहर व परिसरातील इलेक्ट्रॉनिक तसेच मेकॅनिकल वजनकाटे व मापे यांची फेरपडताळणी व मुद्रांकन शिबिर आयोजित केले आहे. मेकॅनिकल (लोखंडी) वजनकाटे व मापांची तपासणी पिराचा दर्गा परिसरात, तर इलेक्ट्रॉनिक वजनकाटे व मापांची तपासणी राऊळवाडा येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ करण्यात येणार आहे. व्यापारी व व्यावसायिकांनी आपल्या वजन-मापांची तपासणी करून मुद्रांकन करून घ्यावे, असे आवाहन विभागाच्या निरीक्षक नम्रता लोखंडे यांनी केले आहे.

धर्मांतर केल्याने मुस्लिम आरक्षणाचा हक्क मिळत नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सरकारी आदेश घटनाबाह्य ठरवला

Tukaram Mundhe: ''नेतृत्व म्हणजे केवळ वर्तमानाचे व्यवस्थापन नव्हे, तर...'', तुकाराम मुंढेंनी व्यक्त केल्या भावना; काळ्या बाजाराचे धाबे दणाणले

Cooperative Knowledge Gallery: ‘दख्खनच्या दंगली’पासून सहकार प्रवासापर्यंतचा माहितीपट; राज्य सहकारी बँकेची ‘सहकार नॉलेज गॅलरी’ उभारणी

2000 कोटींचा फ्लॉप चित्रपट बनवण्याचा भन्नाट प्लॅन, पुन्हा रंगली उदय शेट्टी-मजनू भाईची धमाल; कसा आहे सिनेमा 'वेलकम टू द जंगल'?

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्वल निकमांची एंट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT