कोकण

देवरुख ः विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कायम

CD

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कायम
नियम कागदावरच; पालकांच्यात नाराजी
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १५ ः विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वाढते ओझे हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शासनाने दप्तराचे वजन कमी करण्यासाठी स्पष्ट नियमावली लागू केली असली, तरी अनेक शाळांमध्ये या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी, इयत्तेनुसार निश्चित करण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वजनाचे दप्तर विद्यार्थ्यांना रोज वाहून न्यावे लागत असून, पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शासनाने शाळांसाठी नियमावली तयार करून विद्यार्थ्यांच्या इयत्तेनुसार दप्तराचे कमाल वजन निश्चित केले. तसेच शाळांनी वेळापत्रकानुसार आवश्यक तीच पुस्तके आणि वह्या विद्यार्थ्यांकडून आणून घ्यावीत, वर्गात किंवा शाळेत पुस्तक ठेवण्याची व्यवस्था करावी तसेच अनावश्यक साहित्य दप्तरात ठेवण्यास प्रतिबंध करावा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये विद्यार्थी रोज सर्व विषयांची पुस्तके, वह्या, गृहपाठाच्या वह्या, प्रकल्प साहित्य, चित्रकला साहित्य, पाण्याची बाटली आणि डबा अशा अनेक वस्तू घेऊन येतात. प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना हे जड दप्तर वाहून नेणे अधिक त्रासदायक ठरत असल्याचे पालक सांगतात. शाळांकडून दप्तर तपासणी होणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. डिजिटल शिक्षणाचा वाढता वापर, शाळेत पुस्तकांसाठी स्वतंत्र कपाटांची व्यवस्था तसेच वेळापत्रकाचे योग्य नियोजन केल्यास विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
--------
कोट १
शाळांनी वेळापत्रकानुसार आवश्यक तीच पुस्तके आणण्याचे बंधन घालावे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून दप्तर तपासणी नियमित केली तरच शासनाचा उद्देश साध्य होईल.
-संदीप शिंदे, पालक, देवरूख
------
कोट २
माझा पाल्य प्राथमिक शाळेत आहे. रोज इतके जड दप्तर घेऊन जाताना त्याला त्रास होतो. शासनाने नियम केले असले तरी त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने मुलांनाच त्याचा फटका बसत आहे
नीलांबरी कानाल, संगमेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

Supreme Court: 'अपार आयडी'ला सुप्रीम कोर्टाचा रेड सिग्नल! 26 कोटी विद्यार्थ्यांचा प्रश्न; कोर्टाचा मोठा निर्णय

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींची तीन तासांनंतर सुटका; बाहेर आल्यानंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया...

Marathi Culture: डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या साहित्यिक वारशाचा गौरव; ‘संस्कृती-संशोधन केंद्रा’त चार पुस्तकांचे प्रकाशन

Ambad Highway Chaos: अंबडमध्ये महामार्गावर मोकाट जनावरांचा धुमाकूळ; वाहतुकीला अडथळा, नागरिकांचा जीव मुठीत

SCROLL FOR NEXT