कोकण

दापोली ःदोन मासेमारी नौका जळून खाक, 65 लाखाला फटका

CD

rat१५p१२.jpg-
५१०४१
दापोली ः आंजर्ले तरीबंदरावरील नौकांना लागलेली आग.
------------
आंजर्ले तरीबंदरात आगीचा तांडव
दोन नौका जळून खाक, ६५ लाखाचे नुकसान; मच्छीमारांच्या प्रयत्नांमुळे अनर्थ टळला
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १५ ः तालुक्यातील आंजर्ले येथील तरीबंदरावर ग्रामपंचायतीनजीक उभ्या असलेल्या मासेमारी नौकांना लागलेल्या आगीत दोन नौका पूर्णपणे जळून खाक झाल्या. आगीच्या ज्वाळांनी काही काळ संपूर्ण परिसराला वेढले होते; मात्र, स्थानिक नागरिक आणि हर्णे व पाजपंढरी येथील मच्छीमारांनी प्राणांची बाजी लावून केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आग वेळीच आटोक्यात आली. परिणामी, शेजारील इतर नौका आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचल्या आणि मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत ६५ लाख रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
मंगळवारी (ता. १४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास आंजर्ले खाडीकिनारी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या नौकांमधून अचानक धुराचे लोट निघू लागले. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. दक्षिणेकडून वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाळा वेगाने पसरू लागल्याने परिसरात एकच घबराट पसरली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांनी धाव घेत खाडीतील खाऱ्या पाण्याचा मारा सुरू केला. या वेळी शेजारी उभ्या असलेल्या जयदीप रघुवीर व गजानन तबीब यांच्या नौका आगीच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे होती. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तातडीने आंजर्लेतील एका जेसीबीला बोलावून घेतले. या जेसीबी व दोरखंडाच्या साहाय्याने शेजारील नौका ओढून सुरक्षित अंतरावर हलवल्यामुळे त्या वाचवण्यात यश आले.
दरम्यान, दापोली नगरपंचायतीकडून बुलेटवरील प्राथमिक अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पाठवण्यात आली. दापोलीत स्वतंत्र अग्निशमन दलाची सोय नसल्याने खेड येथून तत्काळ बंब मागवण्यात आला; परंतु, खेड येथून बंब दाखल होण्यापूर्वीच धाडसी स्थानिकांनी जीवाची पर्वा न करता आगीचा फैलाव रोखला होता. या आगीत प्रवीण यशवंत रघुवीर (वय ५५, रा. हर्णै) यांच्या ६ सिलेंडरच्या ''पूर्णिमा'' नौकेवरील जाळी व साहित्य जळून सुमारे २५ लाख रुपयांचे, तर जगन्नाथ पोशिराम पावसे यांच्या ''तेजस्विनी'' नौकेवरील साहित्याचे सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले.


चौकट
...आणि यंत्रणेचा ढिसाळपणा पुन्हा चव्हाट्यावर!
या दुर्दैवी घटनेमुळे आंजर्ले, हर्णे परिसरातील मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, सागरीसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दापोली तालुक्यात कुठेही मोठी आग लागल्यास खेड पालिकेच्या अग्निशमन बंबावर विसंबून राहावे लागते. शासनाकडे अनेकदा मागणी करूनही दापोलीसाठी स्वतंत्र व सुसज्ज अग्निशमन बंब उपलब्ध न झाल्याने स्थानिक मच्छीमार व नागरिकांमधून तीव्र संताप आणि खंत व्यक्त होत आहे.

चौकट
हे करणे गरजेचे
* सध्या शाकारलेल्या नौकांच्या ठिकाणी परिसरात देखरेख करण्याकरिता पहारेकऱ्यांची नेमणूक आवश्यक
* जिथे नौका शाकारल्या आहेत त्या परिसरात ज्वालाग्राही पदार्थ नेण्यास मज्जाव करणे गरजेचे
* नौकामालकांनी दिवसातून दोन ते तीनवेळा नौकाची पाहणी करणे आवश्यक
* हर्णे बंदरात जेटी नसल्याने मच्छीमारांवर उद्भवला प्रसंग
* आगीवर नियंत्रण मिळविण्याची बंबाची सुविधा हर्णेसारख्या ठिकाणी अपेक्षित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

Supreme Court: 'अपार आयडी'ला सुप्रीम कोर्टाचा रेड सिग्नल! 26 कोटी विद्यार्थ्यांचा प्रश्न; कोर्टाचा मोठा निर्णय

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींची तीन तासांनंतर सुटका; बाहेर आल्यानंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया...

Marathi Culture: डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या साहित्यिक वारशाचा गौरव; ‘संस्कृती-संशोधन केंद्रा’त चार पुस्तकांचे प्रकाशन

Ambad Highway Chaos: अंबडमध्ये महामार्गावर मोकाट जनावरांचा धुमाकूळ; वाहतुकीला अडथळा, नागरिकांचा जीव मुठीत

SCROLL FOR NEXT