rat५p९.jpg-
P26O55384
रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद-कवठेवाडी शाळेतील विद्यार्थी भातलावणीचा अनुभव घेताना.
----
वाटदमधील विद्यार्थ्यांनी घेतला भातलावणीचा अनुभव
‘कृषी अनुभूती’ उपक्रम; उत्पादित धान्य वापरणार पोषक आहारासाठी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळावे, या उद्देशाने तालुक्यातील वाटद-कवठेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतात उतरून भातलावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. वाढत्या शहरीकरणात आजची पिढी शेतीपासून दुरावत चालल्याने, विद्यार्थ्यांना अन्नाचे महत्त्व कळावे व शेतीविषयी आत्मीयता निर्माण व्हावी, यासाठी ‘कृषी अनुभूती’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळा व्यवस्थापन समितीच्या विनंतीवरून स्थानिक जमीनमालक महादेव धोपट यांनी शेतजमीन उपलब्ध करून दिली तर पालकांनी शेताची पूर्वतयारी केली. प्रगतशील शेतकरी मारुती कुर्टे व उदय रहाटे यांनी विद्यार्थ्यांना भातशेतीचे बारकावे समजावून सांगितले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान’, ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विकास योजना’ व ‘कृषी यांत्रिकीकरण उपअभियाना’ची माहिती दिली. पालकांनी चिखलणी आणि लावणीचे प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर, विद्यार्थ्यांनी उत्साहाने चिखलात उतरून पारंपरिक गाणी गात भाताची लावणी केली. या शेतातून उत्पादित होणाऱ्या धान्याचा वापर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पूरक आणि पोषक आहारासाठी केला जाणार आहे.
शिक्षणविस्तार अधिकारी सविता तोटावार व केंद्रप्रमुख मीनाक्षी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा विकास समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता कुर्टे, उपाध्यक्ष सागर घवाळी, मुख्याध्यापक माधव अंकलगे, शिक्षिका पूनम कुलकर्णी व पालकांनी विशेष सहकार्य केले. शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.