swt57.jpg
O55401
सावंतवाडी ः विजेत्यांसोबत कौस्तुभ पेडणेकर, स्नेहा पेडणेकर आणि बाळकृष्ण पेडणेकर.
सावंतवाडीत कॅरम स्पर्धेला प्रतिसाद
मुक्ताईचा ॲकेडमीचा उपक्रम ः विजेत्या स्पर्धकांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक (कै.) सूर्यकांत बाळकृष्ण पेडणेकर यांच्या स्मरणार्थ मुक्ताई ॲकेडमीतर्फे विदयार्थ्यांसाठी सावंतवाडी शहर मर्यादित कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पाटणकर वाड्यातील ॲकेडमीच्या कॅरम प्रशिक्षण केंद्रात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध शाळेंमधील पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या ७१ मुलांनी व मुलींनी सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यावेळी मुक्ताईचे अध्यक्ष ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना कॅरमविषयी मार्गदर्शन केले.
विजेत्या स्पर्धकांना ॲकेडमीच्या सरचिटणीस स्नेहा पेडणेकर आणि राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी, सातवी ते दहावी या तीन गटात स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटात चार आणि मुलींसाठी तीन अशाप्रकारे एकूण २१ पारितोषिके देण्यात आली. विजेत्यांना रोख रक्कम, चषक, पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिकप्राप्त विद्यार्थी असे ः गट पहिला (पहिली ते तिसरी) मुलगे-आदित्य सुर्वे, मितांश पेडणेकर, हर्षवर्धन गुरव, शहजान नदाफ. मुली-चैतन्या दाभोलकर. चौथी ते सहावी मुलगे-जयेश जाधव, रत्नजित मोहिते, मोहम्मद खान, नुमान नदाफ.
मुली-आर्या शेख. सातवी ते दहावी-आस्था लोंढे, चारुदत्त गवंडे, स्मित सावंत, अरमान शेख. मुली-आरजू शेख, ईशानी सावंत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.