कोकण

थकित मानधन द्या; अन्यथा काम बंद

CD

थकित मानधन द्या; अन्यथा काम बंद

‘जलजीवन’च्या कर्मचाऱ्यांचा इशारा, उपासमारीची वेळ

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी ता. ५ : देशात आणि राज्यात स्वच्छतेत अग्रेसर असलेल्या सिंधुदुर्गात ‘हर घर जल’ आणि ‘स्वच्छ भारत’ अभियान यशस्वी करणाऱ्या स्वच्छ भारत व जलजीवन मिशनच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे तब्बल ८ महिन्यांचे, तर स्वच्छ भारत मिशनचे ६ महिन्यांचे मानधन थकीत आहे. बँकांचे हप्ते थकल्यामुळे आता करायचे काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १० ऑगस्टपासून जिल्ह्यासह राज्यातील हे कंत्राटी कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
देशातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या जल जीवन मिशन आणि ग्रामीण भारताला हागणदारीमुक्त, स्वच्छ व सुंदर बनविणाऱ्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करणारे कंत्राटी कर्मचारी आज स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी झगडत आहेत. दिवस-रात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ मानधन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कर्मचारी डिसेंबर २०२५ आणि फेब्रुवारी २०२६ पासून पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात त्यांच्या खात्यावर मानधन जमा झालेले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
उत्पन्नाचा कोणताही नियमित स्रोत नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे संसार विस्कळीत झाले आहेत. घरभाडे, वीजबिल, मुलांचे शैक्षणिक शुल्क, वृद्ध पालकांचे औषधोपचार, दैनंदिन किराणा, प्रवास खर्च आणि इतर आवश्यक गरजा भागविणे अत्यंत कठीण झाले आहे. अनेकांना नातेवाईकांकडून किंवा खासगी सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ आली आहे. काही कर्मचाऱ्यांनी आर्थिक अडचणींमुळे मुलांचे शिक्षण थांबण्याचीही भीती व्यक्त केली आहे.
राज्याने ग्रामीण स्वच्छता, ओडीएफ प्लस, हर घर जल, पाणी गुणवत्ता, ग्रामस्तरीय जनजागृती, प्लास्टिकमुक्त उपक्रम, ग्रामपंचायतींसोबत समन्वय, डिजिटल माहिती प्रणाली, सर्वेक्षण, प्रशिक्षण आणि विविध राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या सर्व यशामागे राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण योगदान राहिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यानेही जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार, गौरव आणि प्रशंसा याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मिळविली आहे. गावोगावी जाऊन जनजागृती करणे, ग्रामसभा घेणे, पाणीपुरवठा योजनांचा पाठपुरावा करणे, शौचालय वापराबाबत जनजागृती करणे, माहिती प्रणाली अद्ययावत ठेवणे, शासनाच्या विविध मोहिमा यशस्वी करणे आणि संकटाच्या काळातही सातत्याने सेवा देणे, ही सर्व कामे याच कर्मचाऱ्यांनी निष्ठेने पार पाडली आहेत. आज त्यांना पगारासाठी शासनाच्या दारात हेलपाटे मारावे लागत आहेत, ही शासन व्यवस्थेसाठी अत्यंत चिंतेची बाब असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
---------
१० पासून बेमुदत कामबंद
सततच्या आर्थिक, मानसिक आणि सामाजिक त्रासामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कार्यरत सर्व जिल्हास्तरीय कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असून मागण्या पूर्ण न झाल्यास १० ऑगस्टपासून राज्यातील सर्व कर्मचारी आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
------------
बँकांचे हप्ते थकले
गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज तसेच इतर बँक कर्जांचे मासिक हप्ते वेळेवर भरता न आल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे सिबिल स्कोअर खराब झाले आहेत. यामुळे भविष्यात आर्थिक व्यवहार करणे, नवीन कर्ज मिळविणे किंवा आर्थिक विश्वासार्हता टिकविणे कठीण होणार आहे. नियमित नोकरी करूनही केवळ मानधन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर ही परिस्थिती ओढवणे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT