पीकविमा योजनेच्या मुदतीत
दहा ऑगस्टपर्यंत वाढ
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता ५ : ‘खरीप हंगामातील पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची शेतकऱ्यांना आणखी एक संधी मिळाली आहे. पीक विमा योजनेत अर्ज करण्याची अंतिम मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली असून, जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या मुदतीपूर्वी विमा अर्ज करावेत,’ असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
‘खरीप हंगाम २०२६-२७’मध्ये हवामानातील संभाव्य बदल आणि ‘एल निनो’च्या परिणामांची शक्यता लक्षात घेता पिकांना विमा संरक्षण देणे महत्त्वाचे आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या उत्पादनात घट झाल्यास सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू शकते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात आणि नाचणी या पिकांचा पीक विमा योजनेत समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १५ हजार ८३२ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, यासाठी कृषी विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.
---------
कुठे करता येईल अर्ज?
‘शेतकऱ्यांना जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’, बँक किंवा ‘क्रॉप इन्शुरन्स ॲप’च्या माध्यमातून पीक विमा अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आणि विमा योजनेच्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीपासून आर्थिक आधार मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी १० ऑगस्टपूर्वी पीक विमा काढून घ्यावा,’ असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.