swt513.jpg
55417
कणकवली : निकेत पावसकर यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
हिर्लेकर, पावसकर यांचा दैवज्ञ
हितवर्धक समाजातर्फे सन्मान
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ५ : दैवज्ञ हितवर्धक समाज, कणकवली यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात कलमठ येथील ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय हिर्लेकर आणि तळेरे येथील संदेशपत्र संग्राहक तथा अक्षरोत्सव प्रमुख निकेत पावसकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी डॉ. विनय शिरोडकर होते. व्यासपीठावर कणकवली नगरसेवक संजय कामतेकर, कणकवली व्यापारी संघटना अध्यक्ष दीपक बेलवलकर, दैवज्ञ हितवर्धक समाज कणकवलीचे अध्यक्ष मोहन तळगावकर, विलास जामसंडेकर, ज्येष्ठ सुवर्णकार सुरेश मालडीकर, सन्मानमूर्ती दत्तात्रय हिर्लेकर, निकेत पावसकर, संतोष कुडाळकर, तनय पावसकर, सुधीर कुबल, सुप्रिया महाजन, अरविंद शिरोडकर, मधुकर मालडीकर तसेच दैवज्ञ महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा बेळेकर आदी उपस्थित होते.
दत्तात्रय हिर्लेकर यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केली असून साहित्य, विज्ञान प्रसार आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचे प्रकाशन झाले असून अलीकडेच त्यांच्या एका पुस्तकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. निकेत पावसकर यांनी गेली २० वर्षे विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ताक्षरातील संदेशपत्रांचा संग्रह जतन केला आहे. त्यांच्या संग्रही देश-विदेशातील १८०० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यवरांची संदेशपत्रे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.