कोकण

-रत्नागिरी ः होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीविरोधात आज आयएमएची सेवाबंदी

CD

होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीविरोधात
आज आयएमएची सेवाबंदी
रत्नागिरी, ता. ५ : होमिओपॅथी पदवीधर डॉक्टरांची नावे मॉडर्न मेडिसिनसाठी तयार करण्यात आलेल्या नोंदणीमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्य शाखेने गुरूवारी (ता. ६) राज्यव्यापी सेवाबंदी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला प्रतिसाद देत आयएमए रत्नागिरी शाखेनेही गुरूवारी सकाळी ६ वाजल्यापासून वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आयएमएच्या निवेदनानुसार, होमिओपॅथी पदवीधरांची नावे मॉडर्न मेडिसिनच्या रजिस्टरमध्ये नोंदवण्याच्या निर्णयाला राज्यातील एमबीबीएस व पदव्युत्तर पदवीधर डॉक्टरांचा तीव्र विरोध आहे. याबाबतची भूमिका आणि आक्षेप अनेकवेळा महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवण्यात आले होते; मात्र, शासनाने या भावना विचारात न घेता संबंधित नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सेवाबंदीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला पूर्वसूचना देण्यात आली असून, जिल्ह्याच्या विविध भागांतून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी ही माहिती प्रसारमाध्यमांमार्फत नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याचे आयएमए रत्नागिरीचे अध्यक्ष डॉ. निनाद नाफडे आणि सचिव डॉ. अनघा घाग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT