55497
बांदा ः विक्रांत कदम यांचे अभिनंदन करताना युवराज लखमराजे भोसले. सोबत इतर.
विक्रांत कदम यांचा सत्कार
बांदा ः भाजप युवा मोर्चा बांदा मंडळाच्या शहराध्यक्षपदी विक्रांत कदम यांची नियुक्ती करण्यात आली. युवा मोर्चाचे अध्यक्ष सिद्धेश सगुण कांबळी यांनी नियुक्तीपत्र देऊन ही घोषणा केली. भाजपची विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, युवकांना पक्ष संघटनेशी जोडणे तसेच बांदा शहरात पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. नियुक्तीनंतर विक्रांत कदम यांचे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून अभिनंदन करण्यात आले. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करू, अशी भावना कदम यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.